AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video: एक हरीण 10 शिकारी, अटीतटीची लढाई! शेवटी जंगलाचा राजा आला अन्…थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल

Viral Video: सध्या सोशल मीडियावर जंगलातील अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सर्वांचे लक्ष वेधताना दिसत आहे. जंगलाचा राजा सिंहने ज्या प्रकारे हल्ला केला ते पाहून तुम्ही देखील चकीत व्हाल...

Viral Video: एक हरीण 10 शिकारी, अटीतटीची लढाई! शेवटी जंगलाचा राजा आला अन्...थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
Viral videoImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Sep 16, 2025 | 6:56 PM
Share

जंगलात शिकार आणि शिकारी यांचा खेळ नेहमीच रंगलेला असतो. कधी शिकारी आपल्या शिकाऱ्यावर भारी पडतो आणि त्याला मारतो, तर कधी शिकार शिकाऱ्याला चकमा देऊन पळ काढते. काही वेळा असेही प्रसंग दिसतात, ज्याची कोणी कल्पनाही केलेली नसते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका शिकारीमागे अनेक शिकारी लागलेले दिसतात, पण शेवटी जंगलाचा राजा सिंहाच्या एण्ट्रीने संपूर्ण खेळच बदलतो. मग सर्व प्राणी आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळून लागतात. पण एक शिकारी प्राणी त्याच्या तावडीत सापडतो.

काय आहे व्हायरल व्हिडीओ?

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता की, एक चित्ता हरिणाला आपली शिकार बनवत असतो. पण तेवढ्यात तिथे जंगली कुत्र्यांचा कळप येतो. त्यामुळे चित्ता आपली शिकार तिथेच सोडून जीव वाचवण्यासाठी झाडावर चढतो. आता संधी मिळताच हरिण तेथून पळण्याचा प्रयत्न करतो. पण जंगली कुत्रे त्याला पकडतात. याचवेळी अचानक तिथे तरस येतात, ज्यामुळे जंगली कुत्र्यांची अवस्था बिकट होते. मग काय, तरस हरिणावर तुटून पडतात आणि शिकार संपवतात, फक्त हाडे शिल्लक राहतात.

Viral Video: लाहोरच्या रस्त्यांवर भारतीय जर्सी घालून फिरला व्यक्ती, लोकांनी पाहिलं अन्.. व्हिडीओला कोट्यवधी व्ह्यूज

‘जंगलाच्या राजा’ची एण्ट्री

तरस हरिणाला खात असताना शेवटी जंगलाच्या राजाची, सिंहाची एण्ट्री होते. तो रागात असल्याचे पाहायला मिळते. तो येताच तरसांवर तुटून पडतो आणि एकाला पकडतो. ही संपूर्ण घटना जंगल सफारीसाठी आलेल्या पर्यटकांनी आपल्या कॅमेरात कैद केली, जी पाहता पाहता व्हायरल झाली.

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) वर @Predatorvids या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. सुमारे एक मिनिटाच्या या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले असून, या व्हिडीओवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणतंय की हे खूपच भयानक आहे, तर कोणी दावा करतंय की या व्हिडीओत दोन वेगवेगळ्या घटनांना जोडून हा व्हिडीओ बनवला गेला आहे.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.