…अन् अचानक E-rickshaw चालायला लागली! लोक म्हणतायत, हा तर ‘Mister India’चा डिलीट केलेला सीन..!

| Updated on: Mar 17, 2022 | 6:18 PM

Shocking video : एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे. ज्यामध्ये रस्त्याच्या कडेला उभी केलेली ई-रिक्षा अचानक धावू लागते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोकांनी आश्चर्य व्यक्त केले.

...अन् अचानक E-rickshaw चालायला लागली! लोक म्हणतायत, हा तर Mister Indiaचा डिलीट केलेला सीन..!
अचानक ई-रिक्षा चालकाविना चालायला लागली
Image Credit source: Instagram
Follow us on

Shocking video : कधी-कधी अशा घटना कॅमेऱ्यात कैद होतात, ज्या पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण जाते. तुम्ही व्हिडिओमध्ये जे पाहता ते खरेच घडते का, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण कॅमेरा कधीच खोटे बोलत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे. ज्यामध्ये रस्त्याच्या कडेला उभी केलेली ई-रिक्षा अचानक धावू लागते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोकांनी आश्चर्य व्यक्त केले, तर बहुतांश यूझर्सनी त्यांची प्रतिक्रिया मजेशीर पद्धतीने दिली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोकांना अनिल कपूर स्टारर ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटाची आठवण झाली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ई-रिक्षाशिवाय अनेक गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या आहेत, तर एक व्यक्ती कुठेतरी जात आहे. ही व्यक्ती ई-रिक्षाच्या जवळून जाताच गाडी अचानक आपोआप हलू लागते.

थांबवण्यात अपयशी

हे दृश्य पाहून त्या व्यक्तीला खूप आश्चर्य वाटते. ती काही विचार करण्याआधीच तिच्या दिशेने जात असताना अचानक ई-रिक्षा कारला धडकली. यादरम्यान ती व्यक्ती ई-रिक्षाला लगाम घालण्याचा प्रयत्न करते, पण अपयशी ठरते. चला तर मग हा व्हिडिओ पाहू या.

स्वतःहून कशी धावू लागली?

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात हाच प्रश्न निर्माण होत असेल की ही ई-रिक्षा स्वतःहून कशी धावू लागली? आम्ही याबद्दल सांगू शकत नाही, परंतु कॅमेरा कधीही खोटे बोलत नाही. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटले आहे. गंमतीने अनेकजण म्हणत आहेत, रिक्षात भूत चढले आहे.

मजेशीर कमेंट्स

व्हिडिओ पाहिल्यानंतर बहुतांश लोकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक यूझर म्हणतो, की रिक्षाला बहुतेक पेट्रोलची नशा चढली आहे. त्याचवेळी दुसरा यूझर म्हणतो, की मिस्टर इंडिया चित्रपटाचा डिलीट केलेला सीन आहे. त्याचप्रमाणे आणखी एका यूझरने कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारला आहे, की ही टेस्ला भारतात कधीपासून आली.’ एकंदरीत हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे, लोक याचा खूप आनंद घेत आहेत.

आणखी वाचा :

संगीत खुर्ची नाही तुफान आहे हे! चक्रीवादळाच्या तडाख्यानं हवेत उडाल्या खुर्च्या, Video viral

पत्र देण्यासाठी गेली अन् हरिणांनी रोखला मार्ग, मेलवाहकास आला मजेशीर अनुभव; पाहा Video

#earthquake : शक्तीशाली धक्क्यांनी हादरला Japan; आता Tsunamiचा इशारा, पाहा Viral video