पत्र देण्यासाठी गेली अन् हरिणांनी रोखला मार्ग, मेलवाहकास आला मजेशीर अनुभव; पाहा Video

पत्र देण्यासाठी गेली अन् हरिणांनी रोखला मार्ग, मेलवाहकास आला मजेशीर अनुभव; पाहा Video
पत्र देण्यासाठी आलेल्या महिलेचा हरिणांनी अडवला रस्ता
Image Credit source: Youtube

Animal cute video : हरिणांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यूएस मेलवाहक (US Mail Carrier) डुलुथ, मिनेसोटा (Minnesota's Duluth) येथे पत्र देण्यासाठी पोहोचली. त्यावेळी तिला मिनेसोटामध्ये एका घराबाहेर दोन हरणे (Deers) दिसली, सुरुवातीला ती घाबरली पण नंतर तिला चांगला अनुभव आला.

प्रदीप गरड

|

Mar 17, 2022 | 2:26 PM

Animal cute video : प्राण्यांचे व्हिडिओ आपण सोशल मीडियावर नेहमीच पाहत असतो. आता हरिणांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्या हरिणांनी चक्क रस्ता अडवला आहे. एक यूएस मेलवाहक (US Mail Carrier) डुलुथ, मिनेसोटा (Minnesota’s Duluth) येथे पत्र देण्यासाठी पोहोचली आणि जेव्हा ती तिथे पोहोचली तेव्हा आश्चर्यचकित झाली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, की तिने तिथे काय पाहिले असेल. त्यावेळी तिला मिनेसोटामध्ये एका घराबाहेर दोन हरणे (Deers) दिसली, सुरुवातीला ती घाबरली पण नंतर तिला चांगला अनुभव आला. तिने आपला सुखद अनुभव सांगितला. तिने प्राण्यांशी झालेल्या भेटीचे रेकॉर्डिंग केले आणि तेथील हरणांशी संवाद साधण्याचाही प्रयत्न केला. तुम्हाला कदाचित हा विनोद वाटेल, पण तसे नाही. पोस्टमनने यूट्यूबवर व्हिडिओ शेअर केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

हरणाने रोखला मार्ग

व्हायरल व्हिडिओमध्ये, पोस्टमन फॅन्जी नेल्सन (Fanjie Nelson) पहाटे डुलुथला मेल वितरीत करताना दिसत आहे जेव्हा एका हरणाने तिचा मार्ग रोखला होता. एका घरासमोरच्या रस्त्यावर हरीण उभे होते. नेल्सन हरणाला पत्र दाखवत म्हणतो, ‘हा तुझा मेल आहे ना? हा मेल घे, हे पत्र घेण्यासाठी, आपण चांगले बॅकअप घेऊ शकता. तू इथे राहतोस ना? हे तुमचे घर आहे ना? चल, तुझे नाव काय?’ व्हिडिओच्या शेवटी घराशेजारी आणखी एक हरण दिसले.

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर फन्जी नेल्सन (Fanjie Nelson) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. Mail Delivery in Duluth, Minnesota! असे शीर्षक असलेला हा व्हिडिओ हजारो वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओ कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘नॉर्थलँड (sic) मध्ये मेल वितरीत करण्याचा आणखी एक चांगला दिवस.’

आणखी वाचा :

संगीत खुर्ची नाही तुफान आहे हे! चक्रीवादळाच्या तडाख्यानं हवेत उडाल्या खुर्च्या, Video viral

तरुणीचं धाडस! सापाला उचलून रस्त्याच्या कडेला सोडलं, Video viral

#earthquake : शक्तीशाली धक्क्यांनी हादरला Japan; आता Tsunamiचा इशारा, पाहा Viral video

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें