Video | ना वाजंत्री, ना डीजे, तरी आनंदी अनंद गडे, नवरी-नवरदेवाचा मजेदार व्हिडीओ व्हायरल

सध्या एक अतिशय आगळावेगळा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवरी-नवरदेवाची मिरवणूक दाखवण्यात आली असून नेटकऱ्यांना हा व्हिडीओ चांगलाच आवडला आहे.

Video | ना वाजंत्री, ना डीजे, तरी आनंदी अनंद गडे, नवरी-नवरदेवाचा मजेदार व्हिडीओ व्हायरल
marriage viral video
| Edited By: | Updated on: Nov 11, 2021 | 11:59 AM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील लग्न समारंभाचे व्हिडीओ तर आवडीने पाहिले जातात. काही व्हिडीओमध्ये नवरी-नवरदेवाने केलेली मस्ती दाखलेली असते. तर काही व्हिडीओंमधील लग्नासोहळ्यातील मजेदार भांडण चर्चेचा विषय ठरते. सध्या एक अतिशय आगळावेगळा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवरी-नवरदेवाची मिरवणूक दाखवण्यात आली असून नेटकऱ्यांना तो चांगलाच आवडलाय.

ना डिजे, ना वाजंत्री

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र हा व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. व्हिडीओमध्ये नवरी आणि नवरदेव सोबतच चालत असल्याचे दिसतेय. तसेच त्यांच्यामागून पाहुणे आणि मित्रमंडळीसुद्धा नाचत-नाचत येत आहेत. विशेष म्हणजे नवरी नवरदेवाचे स्वागत करताना येथे भपकेबाजपणा दाखवण्यात आलेला नाही. डीजे, वाजंत्री अशी गर्दी नाहीये. फक्त नव्या जोडीच्या मागे दोघांनी दोन साऊडं बॉक्स पकडले आहेत. या साऊंट बॉक्समधून मजेदार गाणे ऐकायला येत आहे. गाण्यावर नवरी-नवरदेवाचे नातेवाईक मजेत डान्स करत आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, नेटकऱ्यांच्या मजेदार प्रतिक्रिया

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. नेटकही हा व्हिडीओ पाहून मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. भावना सारख्याच असतात. गरीब आणि श्रीमंताचे लग्न असं काही नसतं, असं एका नेटकऱ्याने म्हटलंय. तर वरातीमध्ये सामील झालेले हेच खरे पाहुणे आहेत, असं दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलंय. हा व्हिडीओ IPS रूपीन शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

इतर बातम्या :

Video | झोपेत असताना मित्रासोबत केला प्रँक, मजेदार व्हिडीओ व्हायरल

VIDEO: जेव्हा न्यूझीलंडच्या पंतप्रधानांची अडीच वर्षांची मुलगी फेसबुक लाईव्हच्या मध्ये येते! बघा हा मजेदार आणि भावपूर्ण संवाद

तब्बल 12 फुटांचा किंग कोब्रा विहिरीत पडला, रेस्क्यू करण्यासाठी वन विभागाने लावली जिवाची बाजी

(people dancing on song funny wedding video went viral on social media)