नवरात्रीच्या दिवसांमध्ये घरी लावा ‘ही’ रोपे , तुमच्या समस्या होतील दूर

शारदीय नवरात्रीचा उत्सव सुरू झालेला आहे. वास्तुशास्त्रानुसार नवरात्रीच्या दिवसांमध्ये घरी काही विशिष्ट रोपे लावल्याने जीवनात आनंद आणि शांती येते. त्यामुळे देवी मातेचे आशीर्वाद देखील मिळतात. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊयात कोणती रोपे घरात लावावी.

नवरात्रीच्या दिवसांमध्ये  घरी लावा ही रोपे , तुमच्या समस्या होतील दूर
Navratri
| Edited By: | Updated on: Sep 23, 2025 | 4:31 PM

पंचांगानुसार दरवर्षी नवरात्रीच्या उत्सवाची सुरूवात ही आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून होते. शारदीय नवरात्र हा सण खूप पवित्र मानला जातो. हा उत्सव एकूण नऊ दिवस असून या दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. तसेच नवरात्रीचे हे दिवस देवीच्या पूजेसाठी खूप शुभ मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार या नऊ दिवसांत देवी माता पृथ्वीवर वास करते आणि तिच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते.

त्याचवेळी या शुभ प्रसंगी वास्तुशास्त्रानुसार तुम्ही जर घरात काही खास रोपे लावावीत, ज्यामुळे जीवनात आनंद आणि शांती टिकून राहील. चला तर मग आजच्या या लेखात आपण नवरात्रीमध्ये घरात कोणती रोपे लावावीत हे जाणून घेऊयात.

नवरात्रीत घरी लावा ही शुभ रोपे

तुळशीचे रोप – हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला खूप पवित्र मानले जाते. तुळशीला “देवी लक्ष्मीचे रूप” असेही म्हणतात. नवरात्रीत अंगणात किंवा बाल्कनीत तुळशीचे रोप लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सुख आणि समृद्धी येते. शिवाय, दररोज संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्याने देवीचा आणि भगवान विष्णू यांचे आशीर्वाद मिळतात.

केळीचे रोप – केळीचे रोप भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे. घरात केळीचे रोप लावल्याने संपत्ती आणि समृद्धी वाढते आणि वैवाहिक जीवनात आनंद आणि शांती येते. या नवरात्रीत ते नक्की लावा .

शमीचे रोप- शमी हे रोप भगवान शनिदेवांना समर्पित आहे, परंतु हे रोप देवी मातेला आणि भगवान शिव यांनाही प्रिय आहे. नवरात्रीत घरात शमीचे रोप लावल्याने शत्रूंवर विजय मिळतो आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. ही वनस्पती घरात सकारात्मक ऊर्जा देखील आणते.

जास्वंदाचे झाड – जास्वंदाचे फुल देवीला खूप प्रिय आहेत, विशेषतः लाल रंगाचे जास्वंद. नवरात्रीत देवीला जास्वंदाचे फुले अर्पण केल्याने ती प्रसन्न होते आणि ती तिच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. घरात जास्वंदाचे रोप लावल्याने कौटुंबिक नात्यांमध्ये गोडवा येतो आणि सकारात्मक वातावरण टिकते.

रोपं लावण्याचे नियम

झाडे नेहमी स्वच्छ ठिकाणी आणि योग्य दिशेने लावा.

दररोज रोपांची काळजी घ्या आणि त्यांना पाणी द्या.

सुकलेली रोपं घरात असल्यास ती अशुभ मानल्या जातात, त्यामुळे झाडे हिरवीगार राहतील याची खात्री करा.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)