Viral Video : फाजील धाडसाने घात केला! नाग पाहताच पोलीस जवळ गेला, केलं असं काही की जीवच…
Viral Video : सध्या सोशल मीडियावर एका पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने जे कृत्य केले आहे ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. त्याचा अतिआत्मविश्वास चांगलाच नडला आहे.

सोशल मीडियावर जगभरातील वेगवेगळ्या घटनांचे व्हिडीओ क्षणार्धात व्हायरल होताना दिसतात. सध्या असाच एक हृदयकद्रावक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मध्य प्रदेशमधील इंदौर येथील पोलीस कर्मचाऱ्याचा नाग पकडतानाचा खतरनाक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने जे कृत्य केले त्यामुळे त्याला जीव गमवावा लागले आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण हादरले आहेत.
नेमकं काय घडलं?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये पोलिस कॉन्स्टेबल कोणत्याही सुरक्षिततेशिवाय एका खतरनाक नागाला हाताने पकडताना दिसत आहे. तो व्यक्ती सापाला गोल-गोल गुंडाळण्याचा प्रयत्न करतो, तेवढ्यात नाग मागे वळून त्या व्यक्तीला चावतो. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की तिथे उपस्थित इतर लोक कॉन्स्टेबलला सांगतात की सापाने त्याला चावले आहे, पण तो म्हणत राहतो, ‘काही झालेलं नाही, काही झालेलं नाही.’ त्या व्यक्तीने लोकांना हेही सांगितले की हा एक काळा नाग आहे.
इंदौर में 17 साल से सेवा कर रहे कांस्टेबल संतोष चौधरी की मौत जहरीले साँप के काटने से हो गई।
साँप पकड़ने और उसके साथ तस्वीर खिंचवाने के दौरान हादसा हुआ। इलाज के बावजूद वे बच नहीं सके.. pic.twitter.com/hd3KyRSlCE
— 𝙼𝚛 𝚃𝚢𝚊𝚐𝚒 (@mktyaggi) September 22, 2025
अतिआत्मविश्वास ठरला भारी
हा व्हिडीओ सोशल मीडिया एक्स (पूर्वी ट्विटर) वर @mktyaggi या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये सांगितले आहे की कॉन्स्टेबल संतोष चौधरी यांचा मृत्यू नाग चावल्यामुळे झाला आहे. हा भयानक अपघात साप पकडण्याच्या आणि त्याच्यासोबत फोटो काढण्याच्या प्रयत्नात घडला. समोर आलेल्या माहितीनुसार, सर्पदंशानंतर तात्काळ कॉन्स्टेबलला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना प्रत्येक त्या व्यक्तीसाठी एक धडा आहे, जो साप पकडण्याचे काम करतात किंवा त्याची आवड ठेवतात. या व्हिडीओवर नेटिझन्सच्या तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी कॉन्स्टेबलला श्रद्धांजली वाहिली आहे, तर काहींनी त्यांच्या अतिआत्मविश्वास आणि निष्काळजीपणावर टीका केली आहे.
नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया
एकाने यूजरने कमेंट केले की, “अतिआत्मविश्वासाने घात केला. मृत्यूशी कधीही खेळू नये.” दुसऱ्या यूजरने म्हटले, “सुरक्षिततेच्या उपकरणांशिवाय हिरो बनण्याची गरज नव्हती.” एका अन्य यूजरने लिहिले, “दु:खद, पण हा अतिआत्मविश्वासाचा परिणाम आहे.”
