उन्हात ड्युटी करणाऱ्या पोलिसांसाठी त्याने केलं महत्त्वाचं काम, व्हिडीओने सोशल मीडियावर लोकांची मनं जिंकली
Video Viral : सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये बाईक चालकाने एका पोलिस कर्मचाऱ्याला जे काही गिफ्ट दिलं आहे. ते पाहून अनेकांनी त्या तरुणाचं कौतुक केलं आहे.

मुंबई : देशात सध्या गर्मी कमी झाली आहे. मागच्या आठवड्यात देशात इतकी गर्मी (Biker Heart Touching Video Viral) होती, की लोकांना बाहेर पडायला भीती वाटतं होती. लोकं छत्री किंवा अन्य साधन सोबत घेतल्याशिवाय घरातून बाहेर पडतं नव्हती. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का ? असा स्थितीत आपल्या देशातील अनेक लोकं रस्त्यावर उभे राहून काम करतात. ट्रॅफिक पोलिस (Video Viral) रस्त्यात उभे राहून आपली ड्युटी करायचे. त्यांना तुम्ही कधी काय गिफ्ट दिलंय का ? एका तरुणाने त्यांना त्यांना जे काही गिफ्ट दिलंय त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (trending video) झाला आहे. लोकांनी त्या तरुणाचं कौतुक केलं आहे.
चेहऱ्यावरती हास्य आलं
जिंदगी गुलजार नावाच्या अकाऊंटवरुन एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती आपल्या बाईकवरती दिसत आहे. त्या व्यक्तीचा चेहरा पुर्ण दिसत नाही, परंतु त्याचं शरीर व्यवस्थित दिसत आहे. त्या व्यक्तीचा आवाज तु्म्हाला त्या व्हिडीओत ऐकायला मिळाला आहे. ती व्यक्ती ट्रॅफिक पोलिसांच्या जवळ जाते आणि त्यांना कोल्ड ड्रिंक देत आहे. हे सगळं पाहून पोलिस कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य पाहायला मिळत आहे. त्यांनी त्या तरुणाला शुभेच्छा सुध्दा दिल्या आहेत. त्यावेळी तिथं दोन पोलिस कर्मचारी होते.
View this post on Instagram
लोकं काय म्हणााली…
सध्या हा व्हिडीओ सोशस मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर तो व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला सुध्दा आहे. इंन्स्टाग्रामवरती शेअर झालेल्या व्हिडीओला सव्वा लाख लोकांनी पाहिलं आहे. त्याचबरोबर नेटकरी सुध्दा त्या व्यक्तीची तारिफ करीत आहेत. एका व्यक्तीने सांगितले की, ही आमच्या देशातील चांगली कामगिरी आहे, त्याला आमचा सॅल्यूट, दुसऱ्या एकाने लिहिलं आहे की, इतक्या गर्मीत इतकं व्हायला हवं. त्याचबरोबर अन्य लोकांनी सुध्दा कमेंट केल्या आहेत.
