AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

370 Rupees Biryani Controversy : नोकरी तर गेलीच, फजितीही झाली… 370 रुपयांच्या बिर्याणीवरून नको ते बोलणाऱ्याने गमावला जॉब

Pranit More Show Controversy : स्टँड-अप कॉमेडियन प्रणीत मोरे यांच्या शोदरम्यान महिलांबद्दल अश्लील टिप्पणी करणारा गुरूग्रामचा एका तरूण चांगलाच वादात सापडलाय. या लाइव्ह शोमध्ये त्याने '370 रुपयांची बिर्याणी' वरून केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा वाद पेटला. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्या तरुणाच्या विधानांमुळे महिलांचा अपमान झाला आहे, असे म्हणत लोकांनी त्यावर कडक टीका केली. प्रकरण चिघळल्यानंतर, आता त्या तरूणाच्या कंपनीने त्याला कामावरून काढून टाकलं असून त्याला मोठा धक्का बसला.

370 Rupees Biryani Controversy :  नोकरी तर गेलीच, फजितीही झाली... 370 रुपयांच्या बिर्याणीवरून नको ते बोलणाऱ्याने गमावला जॉब
370 रुपयांच्या बिर्याणीवरून टिप्पणी पडली महागात
| Updated on: Jun 10, 2026 | 10:07 AM
Share

Pranit More Show Controversy : सोशल मीडियावर व्हिडीओ, फोटो प्रचंड व्हायरल होत असतात, त्यात काही सेकंदांच्या क्लिपमध्ये काही लोकं असं काही बोलून जातात, जे नंतर फार महागात पडतं. त्याची किंमत त्यांना आयुष्यभर मोजावी लागते. गुरुग्राममधील एका तरुणाच्या बाबतीतही अशीच घटना घडली. स्टँड-अप कॉमेडियन प्रणीत मोरे याच्या लाइव्ह शोदरम्यान मजेमजेत केलेल्या एका अश्लील टिप्पणीमुळे तो तरूण वादात सापजला. एवढंच नव्हे तर या कॉमेंटचा आता त्याच्या करिअरवरही गंभीर परिणाम झाला आहे. ” 370 रुपयांची बिर्याणी” संदर्भात त्या तरूणाने केलेली कमेंट सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. तो व्हिडिओ व्हायरल होताच, महिलांविषयी अवमानकारक आणि असंस्कृत मानसिकता दर्शवणारे उदाहरण म्हणत, लोकांनी त्याच्यावर कठोर शब्दांत टीका केली. अवघ्या काही तासांतच त्या तरुणाचे नाव, त्याची कंपनी आणि त्याचा व्यवसाय इंटरनेटवर ‘ट्रेंड’ होऊ लागलं.

बघता बघता ही परिस्थिती इतकी चिघळली की, तो तरूणा ज्या डिझाइन कंपनीत तो काम करत होता, त्यांनी एक जाहीर निवेदन प्रसिद्ध करत त्या तरूणाला कामावरूनच काढून टाकलं. ही घटना आता केवळ एका ‘व्हायरल व्हिडिओ’पुरती मर्यादित राहिलेली नसून सोशल मीडिया, सार्वजनिक वर्तन आणि कॉर्पोरेट प्रतिमा यांच्यातील संघर्षाची ‘केस स्टडी’ बनली आहे.

विशेष म्हणजे, या संपूर्ण वादामुळे केवळ संबंधित तरुणाबद्दलच नव्हे, तर कॉमेडी शोची संस्कृती आणि ‘व्हायरल’ कंटेंटची हाव यांबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ‘लाईक्स’ आणि दाद मिळवण्याच्या नादात अनेकजण अशा लाइव्ह शो दरम्यान आपली मर्यादा ओलांडतात, असं अनेक युजर्सचं म्हणणं आहे. दुसरीकडे, सोशल मीडियावरील युजर्सनी कंपनीच्या या निर्णयाचे कौतुक केलं आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचा आदर राखणे आणि कंपनीची प्रतिमा जपणे या दृष्टीने हे पाऊल उचलणे आवश्यक होते, असं त्यांचं म्हणणं आहे. इंटरनेटवर बोललेले शब्द आता खाजगी राहत नाहीत; एकाच व्हायरल क्लिपमुळे अनेक वर्षांची मेहनत वाया जाऊ शकते. म्हणूनच हा विषय सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असलेल्या वादांपैकी एक बनला आहे.

काय आहे ‘370 रुपयांची बिर्याणीचा ’ वाद?

हा संपूर्ण वाद कॉमेडियन, स्टँड अप कलाकार, प्रणीत मोरेच्या ‘लाइव्ह स्टँड-अप शो’दरम्यान झाला. तो प्रेक्षकांशी संवाद साधत असताना, एका तरुणाने आपल्या ‘डेट’बद्दलचा एक किस्सा सांगितला. या संभाषणादरम्यान त्याने सांगितलं की, ‘डेट’साठी तो एका तरूणीसोबत गेला आणि त्याने तिथे चिकन बिर्याणीवर 370 रुपये खर्च केले. नंतर त्याला तो खर्च ‘वसूल’ करायचा होता. त्याचे हे बोलणं ऐकून शोमधील काही लोक हसताना दिसले, पण सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच लोकं चांगलेच संतापले.

त्या व्हिडिओवर हजारो कमेंट्सचा ओघ सुरू झाला.हे बोलणं म्हणजे ‘महिलांचा अपमान’ आहे असं म्हणत युजर्सनी या वक्तव्याचा निषेध केला आणि त्या तरुणाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. अशा प्रकारची मानसिकता समाजातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रतिष्ठेसाठी धोकादायक आहे, असं अनेक महिला युजर्सनी लिहीलं. काहीच वेळात तो व्हिडिओ इन्स्टाग्राम, ‘एक्स’ (X) आणि यूट्यूबवर ट्रेंड होऊ लागला. लोकांनी त्या तरुणाची ओळख शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आणि अखेरीस त्याचे व्यावसायिक प्रोफाईल शोधून काढण्यात त्यांना यश आलं.

संबंधित तरुण हरियाणातील गुरुग्राम येथील एका डिझाइन कंपनीत काम करत होता. पाहता पाहता हे प्रकरण कंपनीच्या मॅनेजमेंटपर्यंत पोहोचलं आणि त्यांनी अंतर्गत चर्चा केली. त्यानंतर कंपनीच्या मालकाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. आपण या मुद्द्याबाबत महिला कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्याचं त्यांनी नमूद केलं. त्या तरुणाविरुद्ध यापूर्वी कोणतीही तक्रार नव्हती आणि तो एक कष्टाळू कर्मचारी होता, मात्र असं असलं तरीही व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील विधान कंपनीची नीतिमत्ता आणि मूल्यांच्या विरोधात आहे, असं कंपनीच्या मालकाने सांगितलं.

त्यामुळे अशा प्रकारची विधाने कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाहीत असं कंपनीने स्पष्ट केलं. आणि त्या तरुणाला त्वरित कामावरून काढून टाकण्याचे त्यांनी जाहीर केलं. कंपनीच्या या निर्णयाला सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला. महिलांबद्दलचं अशा अनादर दाखवणाऱ्या वागण्याला प्रोत्साहन मिळू नये यासाठी कंपन्यांनी अशा प्रकरणांमध्ये थेट मेसेज दिला पाहिजे, अशी कमेंट अनेकांनी केली.

Follow Us
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार