मासा शोधायचाय! टायमर सेट करायचा, पटकन शोधून दाखवायचा

नवीन कोडं घेऊन आलोय यात तुम्हाला मासा शोधायचा आहे.

मासा शोधायचाय! टायमर सेट करायचा, पटकन शोधून दाखवायचा
find a fish
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 23, 2022 | 12:19 PM

नवीन कोडं घेऊन आलोय यात तुम्हाला मासा शोधायचा आहे. आम्ही रोज तुमच्यासाठी ऑप्टिकल भ्रम असणारे फोटो घेऊन येतो. ऑप्टिकल भ्रम म्हणजेच ऑप्टिकल इल्युजन हे लोकांना गोंधळात टाकतात. हे चित्र पाहिलं की लोकांना दिसताना एक दिसतं पण वास्तविक वेगळंच काहीतरी असतं. वास्तविक ओळखण्यात, सांगितलेल्या गोष्टी शोधण्यात बरेचदा लोकांना यश मिळत नाही. काही ऑप्टिकल इल्यूजन तुमची परीक्षा घेतात, तर काही तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगतात.

या व्हायरल फोटोमध्ये तुम्हाला अनेक चित्र दिसतील. पण तुम्हाला त्यात काही मासे दिसतात का? या गोंधळात टाकणाऱ्या फोटोत तुम्हाला मासा शोधावा लागेल.

जर तुम्ही हे करण्यात यशस्वी झालात, तर तुम्ही हुशार आहात. मासे शोधण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी आपल्या मोबाइल फोनवर 15-सेकंदाचा टायमर सेट करा आणि नंतर योग्य उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा.

फोटो नीट पाहिला तर तुम्हाला योग्य उत्तर मिळू शकतं. तरीही उत्तर सापडत नसेल, मासा दिसत नसेल तर तुमच्या डाव्या बाजूला वर बघा. फोटोची वरची बाजू शोधण्याचा प्रयत्न करा. तरीही तुम्हाला मासा सापडला नाही, मग खालील फोटोत पाहा …

Puzzle photo

हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा ऑप्टिकल भ्रम सोडवण्यात अनेक लोक अपयशी ठरले. जर तुम्हाला दिलेल्या वेळेत योग्य उत्तर मिळालं, तर अभिनंदन तुमचे डोळे आणिडोकं खरोखरच तीक्ष्ण आहे.