चित्रात आहे चूक! ज्याच्याकडे निरीक्षण कौशल्य त्यालाच ती सापडणार…

काही लोक असा विचार करीत आहेत की कदाचित अंगठीमध्ये काहीतरी गडबड आहे

चित्रात आहे चूक! ज्याच्याकडे निरीक्षण कौशल्य त्यालाच ती सापडणार...
Find a mistake
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 20, 2022 | 5:11 PM

सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत असतात. अनेक वेळा असे फोटो असतात ज्यात काही चुका असतात पण त्या पकडण्यासाठी आपण खूप कष्ट घेतो. असाच एक फोटो समोर आलाय. ज्यामध्ये मुलीचा एक हात दिसत असून तिने घड्याळ घातले आहे. या चित्रात तुम्हाला चूक शोधून दाखवायची आहे.

खरं तर हे चित्र कोडे आणि भ्रमाशी संबंधित आहे. अशी चित्रे आपल्याला फसवण्यासाठी असतात. अशा चित्रांमुळे आपण जे पाहतो ते सत्य आहे, असा विश्वास वाटतो. तर तसे मुळीच नसते. आता हे चित्र पाहून असे वाटते की, यात चूक नाही पण त्यात चूक आहे. चित्रातील मुलीच्या नखांमध्येही नेल पॉलिश दिसतीये.

हातात घड्याळ घालण्याबरोबरच मुलीच्या मधल्या बोटात अंगठीही दिसते. काही लोक असा विचार करीत आहेत की कदाचित अंगठीमध्ये काहीतरी गडबड आहे. मुलीने हातात घड्याळ घातलंय. या घड्याळात वेळेच्या सुया बरोबर दिसत आहेत, पण त्यात जी पिन आहे ती चुकीची आहे.

घडाळ्याची ॲडजस्ट पिन उजव्या बाजूला असते, पण या चित्रात ही पिन डाव्या बाजूला बसवलेली आहे आणि हीच ती चित्रातली चूक आहे जी सुधारण्याची गरज आहे.