AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain Viral Video : पावसात रस्त्याच्या मधोमध रील शूट करणारी तरुणी, मागून भरधाव वेगात बस आली अन्… व्हिडीओ व्हायरल

Rain Viral Video : आज पाहायला गेलं तर, प्रत्येक जण रील शूट करण्याच्या मागे असतो. आता तर पावसाळा सुरु झाला आहे. अनेक प्रकारचे रील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशात एका तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तरुणी पावसाचा आनंद घेत आहे, पण मध्येच बस आली अन्... व्हिडीओ पाहून व्हाल थक्क...

Rain Viral Video : पावसात रस्त्याच्या मधोमध रील शूट करणारी तरुणी, मागून भरधाव वेगात बस आली अन्... व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Jul 02, 2026 | 11:36 AM
Share

Rain Viral Video : सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता तर पावसाळा सुरु झाला आहे. ज्यामुळे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पावसाळ्यात लोक अनेकदा निसर्गाचं सुंदर दृश्य अनुभवतात आणि सोशल मीडियावर ‘रील्स’ (reels) शेअर देकील करतात. मात्र, रील्स बनवणं कधीकाळी धोक्याचं देखील ठरतं. रिल्ससाठी लोकं अशा ठिकाणी पोहोचतात, जिथे क्षणभर झालेली निष्काळजीपणाही गंभीर अपघाताला निमंत्रण देऊ शकतं. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

पावसात रस्त्याच्या मधोमध ‘रील’ बनवणारी तरुणी

सध्या सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तरुणी मुसळधार पावसाचा आनंद घेत रस्त्याच्या मधोमध डान्स करताना दिसत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे दिसत असून आसपास फारशी रहदारी देखील नाही. अशात तरुणी नाचत असताना ‘रील’ रेकॉर्ड करताना दिसत आहे. रील शूट करत असताना , मागून एक बस भरधाव वेगाने येताना दिसते. बसचा वेग पाहता क्षणभर अपघात होईल असं वाटतं, परंतु ती बस अगदी तिच्या शेजारी येऊन थांबते. बस मागे थांबली आहे, हे पाहून देखील तरुणी थांबत नाही, ती रील बनवणं सुरुच ठेवते. व्हिडीओमध्ये पर्वत से काली घटा गाणं सुरु आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

हा व्हिडिओ @rabiyask2021 या अकाउंटवरुन ‘X’ (ट्विटर) वर शेअर करण्यात आलेला. व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये असं देखील लिहिण्यात आलं आहे की, भररस्त्यात कधीही ‘रील्स’ बनवू नयेत, कारण क्षणभराच्या निष्काळजीपणामुळे कधीकधी गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर तो मोठ्या संख्येने लोकांनी पाहिला आणि त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या.

व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया…

व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक नेकटऱ्यांना तरुणीच्या बेजबाबदारपणाबद्दल चिंता व्यक्त केली. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, “तिचं डोकं फिरलं आहे.”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “नेहमीच काळजी घेतली पाहिजे.” तर अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं, “पावसाचा आनंद घेणंही महत्त्वाचं आहे.” काही लोकांनी त्या व्हिडिओमधील ठिकाणाबाबतही प्रश्न उपस्थित केले.

Follow Us