raksha bandhan 2023 muhurat time : राखी बांधण्याची योग्य वेळ तुम्हाला माहित आहे का ?

raksha bandhan 2023 : यावर्षी रक्षाबंधन कधी आहे यावरुन सोशल मीडियावर मोठा गोंधळ सुरु आहे. लोक त्यावरती आपल्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत. जाणून घ्या लोकांची चर्चा

raksha bandhan 2023 muhurat time : राखी बांधण्याची योग्य वेळ तुम्हाला माहित आहे का ?
raksha bandhan 2023 muhurat time
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 30, 2023 | 11:54 AM

मुंबई : यावर्षी रक्षाबंधन नेमका कधी आहे, यावरुन एक मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. रक्षाबंधनाच्या तारखेला (Raksha Bandhan Shubh Muhurat) घेऊन मोठा गोंधळ झाला आहे. त्याची सोशल मीडियावर अधिक चर्चा सुध्दा सुरु आहे. खरतंर, आजपासून पोर्णिमेला सुरुवात होत आहे. ही पोर्णिमा उद्यापर्यंत राहणार आहे. रक्षाबंधन पोर्णिमेच्या (raksha bandhan 2023) पहिल्या दिवशी साजरं केलं जातं. आज श्रावण पोर्णिमा सुरुवात होत आहे, त्याचबरोबर भद्रकाळ सुद्धा सुरु होत आहे. असं म्हटलं जात की, भद्रकाळात (Bhadra kaal) कोणतंही शुभ काम केलं जात नाही. सोशल मीडियावर सुध्दा गोष्टीची अधिक चर्चा सुरु आहे.

उद्या सकाळी ९ वाजेपर्यंत…

शास्त्रानुसार, भद्रा काळात भावाला राखी बांधण योग्य नाही. त्यामुळे अनेकांना असा प्रश्न पडला आहे की, नेमकं रक्षाबंधन कधी आहे. त्याचबरोबर हा सण नेमका कोणता दिवशी साजरा करायचा ? 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10.48 वाजता सावन पौर्णिमा झाली आहे. उद्या पोर्णिमा सकाळी सात वाजेपर्यंत आहे. भाद्रकाल सावन पौर्णिमेच्या दिवशी सुरु होईल, भाद्रकाल सावन रात्री 9:02 वाजता संपणार आहे. रात्री नऊ वाजेपर्यंत कोणीचं राखी बांधणार नाही. त्यानंतर राखी बांधली जाणार आहे. रात्री ९ वाजल्यापासून सकाळी सातवाजेपर्यंत तुम्ही राखी बांधू शकता.

श्रावण महिन्यातल्या पोर्णिमेला रक्षाबंधनाचा उत्सव

भाऊ आणि बहिणचं अतुट नातं आहे. या नात्यामध्ये तक्रार आणि प्रेम होत असतं, त्याचबरोबर दोन्ही नात्यात विश्वास पाहायला मिळतो. प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यातल्या पोर्णिमेला रक्षाबंधनाचा उत्सव पाहायला मिळतो. या सणांची बहीण भाऊ वाट पाहत असतात. आजच्या दिवशी बहिण भावाला राखी बांधून मोठं आयुष्य मिळावं याची प्रार्थना करते. त्याचबरोबर आपल्या भावासाठी व्रत सुध्दा ठेवते.