रसगुल्ल्याचा पाक आणि नवरदेवाचा मित्र लग्नात आडवा आला, पण शेवट गोड ठरला

एका लग्नात रसगुल्ला आणि नवऱ्याचे मित्र व्हीलन ठरले आणि नवरा रूसून वधूला वरमाला न घालाताच माघारी फिरला पण तरीही शुभमंगल झालेच ते कसे ?

रसगुल्ल्याचा पाक आणि नवरदेवाचा मित्र लग्नात आडवा आला, पण शेवट गोड ठरला
लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरीचे पलायन
Image Credit source: socialmedia
| Updated on: Feb 27, 2023 | 2:31 PM

नवी दिल्ली : असं म्हणतात लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळलेल्या असतात. लग्न म्हणजे दोन जीवांचा मेळ असतो. या अनोख्या रेशमी बंधनात दोन जीवांचे नाते जुळले जात असताना इतर बाबींना किती महत्व द्यायचे दोघांनी ठरवायला हवे…कारण गाझीयाबादमध्ये दोन गुलाबी ह्दयांचे मिलन होत असताना रसगुल्ल्यांचा पाक काटा ठरला. रसगुल्ल्यांच्या पाकामुळे वर आणि वधू मंडळीमध्ये इतकी हाणामारी झाली की एकमेकांच्या उरावर ही मंडळी बसली. त्यामुळे हे लग्न अक्षरश: मोडता मोडता कसेबसे वाचले.

लग्न म्हणजे दोन जीवांचा मैत्र आहे, परंतू भारतीय लग्नात मानपानाला खूपच महत्व दिले जाते. वर आणि वधू पक्षांकडील मंडळींच्या इच्छा आकांक्षांना जादाच महत्व दिल्याने एक लग्न मोडल्याची घटना राजधानी दिल्ली जवळील गाजियाबाद येथे घडली आहे. येथे लग्नाच्या मंडपात जेवणावळी चालू असताना अचानक रसगुल्ल्याने गडबड केली आहे.

काय आहे पूर्ण प्रकरण…

ही घटना गाजियाबाद येथील लोनी येथे घडली आहे. येथील एका लग्नामध्ये जेवणाची पंगतीची घाई चालली असताना वधूपक्षाकडील मंडळीच्या चुकीमुळे रसगुल्ल्याचा पाक नवरदेवाच्या कपड्यांवर पडला त्यामुळे मोठा वादंग झाला. शब्दाला शब्द असे भांडण वाढतच गेले. हे प्रकरण अखेर हातघाईवर आले. आणि स्टेजवर लाथाबुक्क्यांची मारामारी सुरू झाली. वधू आणि वर पक्षाकडील मंडळींनी जबरदस्त हाणामारी करीत एकमेकांचे कपडे फाडले.

वास्तविक लग्नात नवरदेव आपल्या काही मित्रांसोबत स्टेजवर बसला होता. तेव्हा सर्वजण वधूची वाट पहात होते. दुसरीकडे जेवण सुरू होते. तेव्हा वधूपक्षाच्या एकाकडून रसगुल्ल्याचा पाक नवरदेवाच्या जवळ स्टेजवर बसलेल्या त्याच्या मित्राच्या कपड्यावर सांडला. नटून थटून चांगले कपडे घातलेल्या या मित्राच्या अंगावरील कपडे खराब झाल्याने याचा जाब विचारला गेला. परंतू वधू पक्षाचे लोकही जराही न वरमता त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

दोन्ही पक्षांकडील मंडळींपैकी कोणीही माघार न घेतल्याने भांडण वाढतच गेले आहे. आणि शब्दावरून सुरू झालेली बाचाबाची थेट एकमेकांना लाथा आणि ठोसे मारण्यापर्यंत गेली. या मारहाणीमुळे नवरदेव इतका नाराज झाला की वधूला वरमाला न घालाताच परत माघारी गेला. त्यानंतर वधूपक्षाच्या मंडळीनी पोलीसांना पाचारण केले. त्यानंतर पोलीसांनी मध्यस्ती केल्यानंतर कसे तरी वराच्या मंडळींचा पारा खाली आला.