ही व्हायरल पोस्ट वाचून तुमच्या नोकरीकडून असणाऱ्या अपेक्षाच बदलतील! वाचाच

ही पोस्ट बघा. नोकरीकडून असणाऱ्या तुमच्या अपेक्षाच बदलतील. ही पोस्ट व्हायरल झालीये. तुम्ही जर हे वाचलंत तर तुम्हाला याच ठिकाणी काम करायला जायची इच्छा होईल. ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना एकसे बढकर एक सुविधा देतेय.

ही व्हायरल पोस्ट वाचून तुमच्या नोकरीकडून असणाऱ्या अपेक्षाच बदलतील! वाचाच
job viral post
| Updated on: Aug 29, 2023 | 10:56 PM

मुंबई: प्रत्येकाची अशी इच्छा असते की आपल्याला एक नंबर नोकरी मिळावी. एक नंबर म्हणजे सगळ्यात चांगली! अशी कुणालाच मिळणार नाही अशी नोकरी प्रत्येकालाच हवी. मग आता यात अपेक्षा काय काय असतात तुम्हाला तर माहितच असतील कारण या अपेक्षा सगळ्यांच्या सारख्याच असतात. आपली नोकरी कशीही असो आपल्याला मिळणाऱ्या सुविधा मात्र खूप चांगल्या आणि परिपूर्ण असाव्यात अशी ती अपेक्षा. मग त्यात मेडिकल सुविधा आली, ऑफिसचा पिकअप ड्रॉप आला, सगळंच आलं. कंपनी जशी असेल त्या तोडीच्या अपेक्षा ठेवण्यात काही गैर नाही. कामगारांचे हक्क एका बाजूला आणि कंपनी स्वतःहून कामगारांसाठी काय करतेय हे एका बाजूला, नाही का? अशीच एक पोस्ट व्हायरल होतेय ज्यात कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना एकसे बढकर एक सुविधा देतेय.

आश्चर्याचा धक्का बसेल!

हे एक रेस्टॉरंट आहे जिथे स्टाफची गरज आहे. त्यांना सर्व्हिस क्रू आणि किचन क्रू ची गरज आहे. इथे प्रत्येक तासावर पैसे दिले जाणार आहेत. फुल टाईम लोकांना सुद्धा वेगळा पगार देऊ केला जाणारे. हा पगार दोन लाखांच्या आसपास आहे. बरं याव्यतिरिक्त त्यांना ज्या सुविधा मिळणार आहेत त्या वाचाल तर आश्चर्याचा धक्का बसेल!

स्टडी कोर्स साठी स्पॉन्सर

या नोकरीत कर्मचाऱ्यांना जेवणासाठी अतिरिक्त भत्ता दिला जाणारे, कर्मचारी भत्ता दिला जाणारे, मेडिकल अलाउन्स दिला जाणारे, डेंटल तपासणीसाठी सुद्धा हे कर्मचारी पैसे न देता आपले उपचार करून घेऊ शकतात. शिवाय वर्षाला पगारवाढ चांगली! आहे ना तुमच्या स्वप्नातली नोकरी? या नोकरीत कर्मचाऱ्यांना भरभरून बोनस देखील आहे. कोणता कर्मचारी शिक्षण घेत असेल तर त्यासाठी विशेष सूट आहे. हे तर काहीच नाही कर्मचाऱ्याला शिकायचं असेल तर त्यांना स्टडी कोर्स साठी स्पॉन्सर करायला तयार. शिक्षणाचा खर्च सुद्धा रेस्टॉरंट उचलणार म्हणजे काय? यापेक्षा आनंद नाही.