
लग्नात डान्स नसेल तर उत्साह्याचं वातावरण तयार होत नाही. कोणत्याही लग्नात डीजे असला की ती एक वेगळी मजा असते. लोक खूप नाचतात ही नाचणाऱ्यांची संख्या आणखी वाढत जाते. अनेक वेळा डीजे फ्लोअरही लग्नस्थळी उपस्थित असतो, तिथे लोकांना नाचायला प्रचंड आवडतं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या निमित्ताने दोन-चार नव्हे तर डझनभर लोक नाचत असतात, पण अशी एक घटना घडते की ज्याचा कोणी विचारही केला नसेल. होय, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पाहुण्यांच्या पायाखालची जमीन सरकली, ही म्हण नाही हे खरोखर असं घडतंय.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये असं पाहायला मिळत आहे की, लग्नात आलेले पाहुणे खूप आनंदी आहेत आणि प्रत्येकजण आनंद घेण्यासाठी एका गाण्यावर नाचत होता.
नाचता नाचताच सगळेच उड्या मारतानाही दिसले. मात्र, काही सेकंदात त्यांच्यासोबत अनुचित प्रकार घडणार आहे, हे कुणालाच माहीत नाही. लग्नात पाहुणे नाचत असताना अचानक पायाखालची जमीन सरकली.
एका ठिकाणी अनेक पाहुणे एका गाण्यावर नाचत होते. हे लोकं इतक्या जोराजोरात नाचत होते की तिथे हा अपघात झाला जमीन कित्येक फूट खाली कोसळली.
व्हिडिओत तुम्हाला एक धक्कादायक दृश्य पाहायलाच हवं. असे दिसते की लग्न एका मजल्याच्या इमारतीत आयोजित केले गेले होते.
सुदैवाने जमीन कोसळल्यानंतर सर्वजण काही फूट खाली पडले आणि लोकांना किरकोळ जखमा झाल्या, पण हे दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. oops_sorry30 नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.