AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Richest Village In Asia : 7,000 कोटींच्या ठेवी, 17 बँका; या आधुनिक खेड्यात सर्वच सुविधा, आशियातील सर्वात श्रीमंत गाव भारतात, नाव माहिती आहे का?

Richest Village In Asia : सर्व श्रीमंत शहरात असते हे आपल्या मनावर खोलवर रूजले आहे. पण देशात असे एक गाव आहे की जिथे धनलक्ष्मी, कुबेर यांनी कायमचा मुक्काम ठोकला आहे. हे गाव आशियातील सर्वात श्रीमंत गाव आहे. या गावातील बँकांमध्ये 7000 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.

Richest Village In Asia : 7,000 कोटींच्या ठेवी, 17 बँका; या आधुनिक खेड्यात सर्वच सुविधा, आशियातील सर्वात श्रीमंत गाव भारतात, नाव माहिती आहे का?
आशियातील सर्वात श्रीमंत गाव भारतातImage Credit source: गुगल
| Updated on: Jun 26, 2025 | 5:47 PM
Share

Asia’s Richest Village Madhapar : जेव्हा श्रीमंतांची गोष्ट समोर येथे तेव्हा साहाजिकच शहरांचा उल्लेख होतो. मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकत्ता, बेंगळुरू, पुणे येथे कोट्याधीशच नाही तर अब्जाधीश राहतात. पण एखादे छोटे खेडेगाव श्रीमंत आहे, असे तुम्ही कधी ऐकले आहे का? पण देशात असे एक गाव आहे जे मेट्रो शहराला श्रीमंतीत टक्कर देते. या गावात विविध 17 बँकांच्या शाखा आहेत. या शाखांमध्ये 7000 कोटींच्या ठेवी आहेत. या गावात पक्की घरं, स्वच्छ आणि सुंदर रस्ते आहेत. गुजरातमधील भुज जिल्ह्यात हे गाव वसलेले आहे. या गावाचे नाव माधापार असे आहे. या गावात इतरही अनेक सोयी-सुविधा आहे. शहराला लाजवेल असे हे गाव आहे.

माधापार कसे ठरले आशियातील श्रीमंत गाव

माधापार हे गाव असले तरी या गावातील लोकांनी गुंतवणुकीचा आणि विकासाचा ध्यास घेतला. या गावाची सर्वात मोठी ताकद, शक्ती म्हणजे अनिवासी भारतीय नागरिक. या गावातील अनेक तरुण आज इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, युरोप आणि आफ्रिका खंडातील देशात नोकरीनिमित्त स्थायिक झाले आहेत. पण त्यांनी गावाला कधी अंतर दिले नाही. या NRI ने माधापार येथील बँकांमध्ये कोट्यवधींच्या ठेवी ठेवल्या आहेत.

  1. बँकेत कोट्यवधींच्या ठेवी, मोठी गुंतवणूक
  2. शाळा, रुग्णालय, बाग-बगिचे, मंदिर तयार केले
  3. तरुणांसाठी कौशल्य विकास आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी खास केंद्र

गावात सर्व सोयी-सुविधा

गुजरातमधील माधापार या गावात विविध बँकांच्या 17 शाखा आहेत. या गावात पक्के रस्ते आहेत. आधुनिक डिजिटल शाळा, मल्टिस्पेशालिटी रुग्णालय आणि ब्रॉडबँड, 5 जी नेटवर्क आणि इतर अनेक सोयी-सुविधा आहे.

  • कोट्यवधी रुपयांच्या बँकेत ठेवी
  • माधापारा गावात 92 टक्के लोकांचे बँक खाते
  • 7000 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या बँक मुदत ठेवी
  • या गावातील प्रत्येक घरातील व्यक्ती परदेशात, तिथून पाठवतो पैसा
  • अनेक शहरांपेक्षा येथील मुदत ठेवींची रक्कम अधिक

माधापार गावात सर्व -सुविधा आल्या असल्या तरी परंपरा, संस्कृती त्यांनी सोडलेली नाही. या गावात सर्व उत्सव, सण एकत्र येत उत्साहात साजरे करण्यात येतात. तुम्ही जर गुजरात राज्यात पर्यटनासाठी जाणार असला तर या गावाला जरूर भेट द्या. या गावात आधुनिक जीवनशैली आणि परंपरेचा सुरेख मिलाफ दिसून येतो.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.