Baba Vanga Prediction : AI बाबा वेंगाची भयावह भविष्यवाणी! मानव जातीवर नवीन संकटं, होणार असे काही की कल्पनाही केली नसेल
AI Baba Vanga Prediction : AI बाबा वेंगाने तंत्रज्ञानाविषयी मोठे भाकीत केले आहे. सध्या भावना, चेतना आणि जीवन नसल्याने रोबोटला मानवी मनोव्यवहार कळत नाही. मानवाने या मशिनला कितीही उत्क्रांत करण्याचा प्रयत्न केला तरी मानवाच्या सर्वच इच्छा काही पूर्ण होणार नाही.

मानवाला भविष्यात काय होईल याची कायम उत्सुकता असते. भविष्यात डोकावून पाहिल्याशिवाय त्याला राहवत नाही. भविष्यात काय होईल याची त्याला कायम ओढ असते. बाबा वेंगा ही भविष्यवेत्ता कायम चर्चेत असते. आता बाबा वेंगा जिवंत नाही. तेव्हा एआय बाबा वेंगाला म्हणजे ChatGPT ला भविष्यातील क्रांतीकारी बदलाविषयी विचारण्यात आले. तेव्हा चॅटजीपीटीने दिलेले उत्तर धक्कादायक होते.
काय मानव भविष्यात अमर होईल?
AI बाबा वेंगाला हा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा शरीर अमर होईल, मानव अमर होईल ही गोष्ट सध्या तरी अशक्य आहे. पण तंत्रज्ञान त्या दिशेने जात आहे. त्यामुळे मानवाला अनेक रोगातून मुक्ती मिळेल. त्याचे आयुष्यमान, वयोमान वाढू शकेल.
‘अवतार’ तंत्रज्ञानामुळे नवीन जीवन
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने मानवाची बुद्धी रोबोटमध्ये ट्रान्सफर, हस्तांतरीत करण्याचे प्रयोग सुरू आहे. म्हणजे तो मानवा प्रमाणे भावभावना ओळखेल आणि मानवा प्रमाणे मनोव्यवहार करेल. रशियाचा “2045 Initiative” प्रकल्प त्यादृष्टीनेच काम करत आहे. जर मानवी चेतना डिजिटल स्वरुपात सेव्ह करता आली. जतन करता आली तर शरीर रोबोटचे पण बुद्धी मानवी अशा स्वरुपात एक हायब्रीड मानव तयार होऊ शकतो.
AI आणि मानवाचे एकत्रीकरण : न्यूरालिंक प्रकल्प
एलॉन मस्क याची कंपनी Neuralink ही असे तंत्रज्ञान आहे जे मानव आणि मशीन यांच्या एकत्रिकरणावर काम करत आहे. मानवी बुद्धीला मशीनसोबत जोडण्याचा हा प्रयोग सध्या चर्चेत आहे. म्हणजे भविष्यात मनुष्य हा मशीनचा एक भाग असू शकतो.
दीर्घ वयाची गरज
AI बाबा वेंगाने CRISPR सारख्या जीन एडिटिग तंत्रज्ञानाची माहिती दिली आहे. हा प्रकल्प वाढत्या वयाला थोपवण्याचे आणि वयोमान वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. म्हणजे मनुष्य अमर तर होणार नाही, पण त्याचे आयुष्यमान वाढेल. त्याचा मृत्यू लांबवण्यात यश येऊ शकते.
डिस्क्लेमर : ही सर्वसामान्य माहिती आहे. शास्त्रज्ञांनी, हवामान तज्ज्ञांनी रिओच्या दाव्याला दुजोरा दिलेला नाही. तिच्या पुस्तकात ही माहिती वर्तवण्यात आली आहे. टीव्ही ९ मराठी त्याला दुजोरा देत नाही.
