Video: दिल्ली-गुरुग्राम रस्त्याच्या ब्रीजखाली एअऱ इंडियाचं विमान अडकलं, नेमकं सत्य काय?

Viral Video: एअर इंडियाचं एक विमान हायवेवरच्या फूटओव्हर ब्रीजखाली अडकलेलं दिसतं आहे. या विमानाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

Video: दिल्ली-गुरुग्राम रस्त्याच्या ब्रीजखाली एअऱ इंडियाचं विमान अडकलं, नेमकं सत्य काय?
विमान अडकल्याने वाहतुकीला अडथळा होत असल्याचं सांगितलं जात आहे.
| Edited By: | Updated on: Oct 04, 2021 | 3:26 PM

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, या व्हिडीओमध्ये चक्क एअर इंडियाचं एक विमान हायवेवरच्या फूटओव्हर ब्रीजखाली अडकलेलं दिसतं आहे. या विमानाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. दिल्ली विमानतळाबाहेरच्या दिल्ली-गुरुग्राम रस्त्यावरची ही दृश्यं असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला आहे की, एअर इंडियाचं विमान रस्त्यावर काय करतं आहे आणि हे या पुलाखाली अडकलं कसं? (scrapped-plane-gets-stuck-under-delhi-bridge-watch-viral-video-on-twitter- )

तुमच्या माहितीसाठी, या विमानाचा कुठलाही अपघात झालेला नाही, किंवा विमानाचं इमर्जन्सी लँडिग करावं लागलेलं नाही. हे एअर इंडियचं एक जुनं आणि जीर्ण झालेलं विमान आहे, जे कंपनीने भंगारात काढलं आहे. ते एका दुसऱ्या कंपनीला विकलं गेलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, हा फोटो व्हायरल झाल्यानंतर एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ज्या विमानाचे फोटो व्हायरल होत आहेत, ते एक जुनं आणि खराब विमान आहे. जे आम्ही विकलं आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये, विमानाच्या आजूबाजूला वाहने जाताना येताना दिसत आहेत. त्याचबरोबर महामार्गावर खूप गर्दी दिसते आहे, तर दुसरीकडे विमान अडकल्याने वाहतुकीला अडथळा होत असल्याचं सांगितलं जात आहे. हे विमान जेव्हा नेलं जात होतं, तेव्हा विमानाचा पुढचा भागाने तर फुट ओव्हरब्रिजखाली ओलांडला आहे, पण मागचा पंखांकडचा भाग अडकला. सोशल मीडिया अनेक युजर्स या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

पाहा व्हिडीओ:

एका सोशल मीडिया युजर्सने लिहिले की, ‘ मी पहिल्यांदाच जमिनीवर पळणारं विमान पहालं आहे’ दुसर्‍याने लिहिले, ‘ज्या भावाने हे विमान अडकवलं आहे, त्याला सांगा की विमान आकाशात उडून दुसरीकडे नेलं जातं, रस्त्यावरुन नाही. याशिवाय अनेकजण इमोजीजद्वारे आपल्या भावना व्यक्त करत आहेत. दरम्यान, आम्हीही या विमानासंदर्भात दिल्ली विमानतळाशी संपर्क साधला, त्यावेळी एका अधिकाऱ्याने सांगितले, ‘विमान निश्चितपणे दिल्ली विमानतळाच्या ताफ्याशी संबंधित नाही , वाहन चालकाच्या चुकीमुळे अडकले आहे.

हेही पाहा:

Video | हवाई सुंदरीचा विमानात बहारदार डान्स, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Video | 10 सेकंदाचा थरार, छोट्या मुलाचा स्टंट एकदा पाहाच !