ताजमहलच्या आतील सिक्रेट रुम,जेथे आहे प्रवेशाला बंदी, काय आहे त्यात ? Viral Video

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर @bobbykhan2786 नावाच्या युजरने शेअर केलेला आहे. या व्हिडीओतील व्यक्तीने ताजमहल यांच्या आतील पायऱ्यांवरुन उतरुन आतील सिक्रेट रुम दाखवली आहे.

ताजमहलच्या आतील सिक्रेट रुम,जेथे आहे प्रवेशाला बंदी, काय आहे त्यात ? Viral Video
| Updated on: Aug 20, 2025 | 10:46 PM

जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या आग्रा येथील ताजमहल (Taj Mahal) त्याच्या सौदर्यासाठी प्रसिद्ध आहे. मुगल वास्तू कलेची भव्य इमारत पाहण्यासाठी हजारो पर्यटक येथे येत असतात. परंतू ताजमहलचा एक असाही हिस्सा आहे. जेथे प्रत्येकाला प्रवेश मिळत नाही.अलिकडे याचा भागाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक व्यक्ती ताजमहलच्या आतील त्या जागेला दाखवत आहे.

काही सेकंदाचा हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर @bobbykhan2786 नावाच्या एका युजरने शेअर केलेला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती पायऱ्यांनी उतरत एका अंडरग्राऊंड खोलीत जात आहे. जेथे मुमताज महल आणि शाहजहा यांची असली कब्र असल्याचा दावा केला जात आहे. युजर बॉबी खान यांनी व्हिडीओ शेअर करीत कॅप्शनमध्ये लिहीलेय की आज तुम्हाला

मीडियाच्या बातम्यानुसार ताजमहलमध्ये टुरिस्ट्सना जी कबर दाखवली जाते. तेही वास्तविक केवळ प्रतिकृती आहे. मुमताज आणि शाहजहा यांच्या असली कबरी याच्या खाली एक सिक्रेट रुममध्ये आहेत. हा या खोलीला वर्षातून केवळ खास विशेष प्रसंगीच उघडले जाते. त्यामुळे हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

येथे पाहा व्हिडीओ, मुमताज आणि शाहजहा यांची असली कबर

या व्हिडीओची खास बाब केवल गुप्त खोलीच्या आतील नजाराच नाही तर तर बॅकग्राऊंडला वाजत असलेले मोहम्मद रफी यांचे गाणे देखील आहे. ज्याची अनेक नेटीजन्सनी प्रशंसा केली आहे. एका युजरने कमेंट केली आहे की ताजमहलहून अधिक सुंदर रफी साहेब यांचा आवाज आहे. हा व्हिडीओ ५ मे रोजी शेअर केला होता. जो आता ट्रेंडमध्ये आला आहे. व्हिडीओला आतापर्यंत ८२ वेळा पाहिलेले आहे.