AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीमा हैदरला पाकिस्तानातून आली गूड न्यूज, फोटो पोस्ट करुन व्यक्त केला आनंद

पाकिस्तानातून आपल्या चार मुलांसह भारतात प्रियकराला भेटायला आलेल्या सीमा हैदरच्या समाजमाध्यमावरील पोस्टने तिला पाकिस्तानातून गूड न्यूज मिळाली असल्याचे स्पष्ट होत आहे.

सीमा हैदरला पाकिस्तानातून आली गूड न्यूज, फोटो पोस्ट करुन व्यक्त केला आनंद
seema haider Image Credit source: socialmedia
| Updated on: Aug 19, 2023 | 9:28 PM
Share

नवी दिल्ली | 19 ऑगस्ट 2023 : पाकिस्तानातून भारतात प्रियकरासाठी आलेली सीमा हैदर आता सेलिब्रिटी बनली आहे. तिला लाखो लोक फोलो करीत आहेत. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील पोस्ट खूपच पाहीले जात आहे. भारतातील प्रियकराला भेटण्यासाठी आपल्या चार मुलांसह पाकिस्तानातून नेपाळ मार्गे भारतात आलेली सीमा हैदर आता भारतालाच आपला देश मानत असली तरी पाकिस्तानातून तिच्यासाठी गोड बातमी आली आहे. तिने इंस्टाग्रामवर फोटो अपलोड करीत आपला आनंद व्यक्त केला आहे.

सीमा हैदर हीने आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर एका नवजात बाळाचा फोटो शेअर केला आहे. या गोऱ्यागोमट्या बाळाच्या फोटोला तिने कॅप्शन लिहीली आहे की, ‘हमेशा खुश रहो !’ सीमाने या पोस्टच्या बॅकग्राऊंडला गाणेही सेट केले आहे. त्या गाण्याला ऐकले तर हे गाणे मावशीशी संबंधित आहे. म्हणजेच सीमा हैदर मावशी झाली आहे.

सीमा हैदर हीने शेअर केलेला इन्स्टाग्रामवरील फोटो पाहा-

सीमा मावशी झाली

सीमा हैदरने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोवर अनेक युजरनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. एका युजरने लिहीले आहे की किती क्यूट बाळ आहे. तर एका युजरने लिहीलंय की खूपच गोड मुलगी आहे. तर अनेक युजरने म्हटलंय की हे बाळ कुणाचं आहे. अनेक युजरने तर सीमा हैदरला शुभेच्छा दिल्या आहेत. सीमा हैदरने या पोस्टमध्ये स्पष्टपणे काही लिहीलेले नाही. परंतू बॅकग्राऊंडचे गाणे ऐकल्यानंतर तिच्या बहिणीला बाळ झाल्याचे स्पष्ट होत आहे.

सचिनसाठी व्रत

सीमा हैदरचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहेत त्यात तिने हिरवी साडी घालून सिंदूर आणि बिंदी लावली आहे. ती हाथ जोडून जय श्री राम चा नारा लावताना दिसत आहे. तिने कुटुंबियासोबत हरियाली तीज साजरी करीत असल्याचे म्हटले आहे. मागे तिने 15 ऑगस्ट रोजी पाकिस्तान मुर्दाबाद तसेच हिंदुस्थान झिंदाबादच्या घोषणा दिल्याचा व्हिडीओही गाजला होता. सीमा हैदरने भारतीय नागरित्व मिळण्याची मागणी राष्ट्रपतींकडे केली आहे. परंतू सीमाचा दुसरीकडे तपासही सुरु आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?