
सीमा हैदर एक अस नाव जे गेल्या वर्षी पासून चांगलच चर्चेत आहे. PUBG खेळता खेळता भारतात आलेली आणि सचिन मीणा नावाच्या तरुणावर प्रेम करणारी सीमा, तिच्या प्रेमकथेमुळे आणि भारतात नेपाळमार्गे येण्याच्या पद्धतीमुळे देशभर चर्चेत होती. आता हीच सीमा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, पण यावेळी कारण कारण आहे ता म्हणजे तीची YouTube वरून होणारी कमाई! होय, सीमा आता युट्यूब क्रिएटर झाली आहे आणि चांगली कमाई करत असल्याचं ती स्वतः सांगते.
सीमा आणि तिचा जोडीदार सचिन, दोघं मिळून सध्या तब्बल ६ वेगवेगळे युट्यूब चॅनल्स चालवत आहेत. या चॅनल्सवर ते त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील घडामोडी, कुटुंबासोबतचे खास क्षण, प्रवास, अनुभव अशा विविध गोष्टी शेअर करतात. सीमाच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला तिने YouTube वरून सुमारे ४५,००० रुपयांची कमाई केली होती. मात्र हळूहळू व्ह्यूज वाढले आणि लोकप्रियता मिळाल्यानंतर सध्या तिची मासिक कमाई ८० हजार ते १ लाख रुपयांदरम्यान पोहोचली आहे.
केवळ व्हिडीओवर मिळणाऱ्या व्ह्यूजमधूनच नव्हे, तर लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये मिळणारे डोनेशन्स, ब्रँड प्रमोशन्स यामधूनही सीमाला कमाई होते. ती सांगते की, सुमारे ५ मिनिटांच्या व्हिडीओला १,००० व्ह्यूज मिळाल्यास सुमारे २५ रुपये मिळतात, तर YouTube Shorts ला १ लाख व्ह्यूज मिळाल्यास सुमारे ८० रुपये मिळतात. आता YouTube वरून मिळणाऱ्या स्थिर उत्पन्नामुळे तिने सचिनलाही पूर्णवेळ युट्यूबवर लक्ष केंद्रित करायला सांगितलं आहे.
जर तुम्हालाही YouTube वरून पैसे कमवायचे असतील, तर YouTube Partner Program (YPP) मध्ये सहभागी होणं आवश्यक आहे. यासाठी तुमच्याकडे किमान ५०० सबस्क्रायबर्स असावेत आणि गेल्या १२ महिन्यांत तुमच्या व्हिडीओंना ३,००० वॉच अवर्स किंवा ९० दिवसांत Shorts ला ३० लाख व्ह्यूज मिळालेले असावेत. हे निकष पूर्ण केल्यावरच यूट्यूबवरून कमाई सुरू होते.
थोडक्यात, सीमा हैदरची यशोगाथा ही केवळ प्रेमकथा न राहता आता एक यशस्वी युट्यूबर म्हणूनही समोर येतेय. तिची कथा पाहून अनेकांना YouTube वरून कमाई करता येते हे नव्याने उमगलं आहे. सातत्याने चांगले कंटेंट तयार केला तर तुम्हीही डिजिटल माध्यमातून आर्थिक स्थैर्य मिळवू शकता.