AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिने नवरा हरवल्याची कम्प्लेंट पोलीसांना केली होती, आठ महिन्यानंतर तो घरातच सापडला

ख्रिसमस जवळ आल्याने ख्रिसमस ट्री लावण्यासाठी काही डेकोरेशनच्या वस्तू मिळतात का ते पहाण्यासाठी शोधाशोध केली तर मला हे सापडले

तिने नवरा हरवल्याची कम्प्लेंट पोलीसांना केली होती, आठ महिन्यानंतर तो घरातच सापडला
WARDROBImage Credit source: socialmedia
| Updated on: Mar 09, 2023 | 7:30 PM
Share

वॉशिग्टन डीसी : एखादी आवडती व्यक्ती नाहीशी झाली तर आपल्या तिच्या वाचून राहवत नाही. आणि ती जर रक्त्याच्या नात्यातील असेल तर एकही दिवस त्या व्यक्तीच्या आठवणी वाचून आपण राहू शकत नाही. उत्तर-पूर्व-मध्य अमेरिकेत एक  विचित्र घटना घडली आहे. जे कळल्यानंतर तुमचाही थरकाप उडेल. एका महिलेचा पती हरवल्याची तक्रार तिने केल्यानंतर तो सापडच नव्हता, पोलिसांनीही हात ठेकले, अखेर आठ महिन्यानंतर कळले तिच्या वॉर्डरोबमध्येच तो होता !

जेनिफर मेइडगे यांनी त्यांचा पती नाहीसा झाल्याची तक्रार गेल्यावर्षी 27 एप्रिल रोजी केली होती. महिलेची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला, परंतू तपास पुढे सरकलाच नाही. पोलिसांनी महिल्याच्या घराची तपासणी देखील केली होती, परंतू काहीच उपयोग झाला नाही. आपला नवरा काही परत येत नाही असे समजून आठ महिने झाले तरी पोलिसांनी काहीच सापडले नाही, त्यामुळे कंटाळून पोलिसांनी नाद सोडून दिला.

ख्रिसमस जवळ आल्याने डेकोरेशन करण्यासाठी वस्तू आणण्याची घरोघरी घाई चालली होती. त्यामुळे जेनिफर यांनी काही कॅश शोधण्यासाठी तिचा वॉर्ड रोब उघडला तर दुर्गंधी पसरली. तिने पोलिसांना कॉल केला. पोलीस घरात आले तर शरीर कुजल्याचा वास पसरला होता. मिस्टर सापडले पण त्यांचे शरीर शुष्क होऊन त्याची अक्षरश: ममी झाली होती. पोलिसांनी पोस्टमार्टेमसाठी बॉडी पाठवली. मिस्टर मेइडगे यांनी आत्महत्या केल्याचे तपासात स्पष्ट झाले.

कारच्या चाव्या आणि वॉलेट अजूनही तेथेच

आपण ख्रिसमस जवळ आल्याने ख्रिसमस ट्री लावण्यासाठी काही डेकोरेशनच्या वस्तू मिळतात का ते पहाण्यासाठी शोधाशोध केली तर मला हे सापडले अशी प्रतिक्रीया जेनिफर यांनी ‘दि सेंट लुईस पोस्ट डीस्पॅच’ या नियतकालिकाला दिली. त्याने आत्महत्या केली आहे. जेनिफर यांचे त्यांच्या नवऱ्याशी शेवटचे संभाषण त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली त्याच्या आदल्या दिवशी झाले होते. त्याने त्या दिवशी आपल्या कॉल करून कळविले होते की आज ते कामावरून लवकर येणार आहेत. त्या घरी आल्या तेव्हा त्यांचा पती घरी नव्हता. परंतू त्यांची कार घरात पार्क केली होती. आणि कारच्या चाव्या आणि वॉलेट अजूनही तेथेच आहे. पोलीसांना यात काही कट वगैरे वाटत नाही, त्यांनी ही फाईल बंद केली आहे.

Follow Us
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मनोज जरांगे पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत?
मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत आंदोलनाचा मानस, मराठा आरक्षणावरून नवा सस्पेन्स
'पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता १० लाखांचा दंड'
पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता कठोर पाऊले उचलणार: तुकाराम मुंढे
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली; मराठवाडा दौरा रद्द
अशक्तपणा आणि ताप, मनोज जरांगे पाटील यांच्यावर जालन्यात उपचार सुरू