
लिबियातील एका इसमाला अटक करण्यात आली आहे. कारण त्याने त्याच्या पाळीव सिंहाला इजिप्तच्या कर्मचाऱ्यावर सोडून दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून कोणालाही धडकी भरेल असा आहे. त्यानंतर या इसमाच्या क्रुरतेविषयी युजर संताप व्यक्त केला. त्यानंतर या सिंहाच्या मालकाला अटक करुन त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल केले आहेत.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की एका इसमाच्या अंगावर सिंह चालून त्याला कवटाळत आणि अनेकदा या व्यक्तीला हा सिंह चावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. सिंहाच्या तावडीत सापडलेला व्यक्ती शांत दिसत आहे. तो स्वत:ला सिंहाच्या पंजातून सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतू सिंहाच्या ताकदीपुढे असहाय दिसत आहे.तो मालकाला विनंती करताना दिसत आहे.
लिबियाच्या व्यक्तीने दावा केला आहे की ही एक मस्करी होती. परंतू कोर्टाने यास स्पष्टपणे शक्तीचा दुरुपयोग म्हणून पाहिले आहे. सरकारी पक्षाने हा सार्वजनिक सुरक्षेसाठी एक गंभीर धोका मानला आहे.
गल्फ न्यूजच्या मते अटक केलेल्या शतेकऱ्यावर मानवी जीवन धोक्यात घातल्याचा आणि नागरिकावर दहशत पसरवून मानसिक आणि सामाजिक नुकसान पोहचवण्याचा आरोप लावला आहे. याशिवाय त्यावर धार्मिक आणि नागरिक कायद्याच्या विरोधात कार्य केल्याचा आरोप केला आहे.
पाहा व्हायरल व्हिडिओ
#فيديو| حالة من الغضب تجتاح منصات التواصل الاجتماعي عقب تداول مقطع مصور يظهر صاحب مزرعة في ليبيا وهو يطلق أسداً على عامل مصري يعمل لديه#صحيفة_الخليج pic.twitter.com/CPSqRty9tT
— صحيفة الخليج (@alkhaleej) August 18, 2025
सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून लोक या व्हिडीओवर आपला राग व्यक्त करत आहेत. एका युजरने लिहिलय की व्हिडीओत सिंहाच्या तावडीत सापडलेला व्यक्ती शांत आणि कधी-कधी हसताना दिसत आहे. त्यामुळे तो घाबरलेला वाटत नाही. तर अनेक लोकांनी ही स्थिती धोकादायक देखील ठरु शकली असती असे म्हटले आहे.