Viral Video: कोर्टाच्या व्हर्च्युअल सुनावणीत वकीलाचे कारनामे! तिच्याकडे पाहिलं, नंतर जवळ खेचलं आणि मग…

Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कोर्टाच्या व्हर्च्युअल सुनावणीमध्ये वकिलाने थेट एका महिलेला किस केले आहे. ते पाहून अनेकांनी त्यावर टीका केली आहे.

Viral Video: कोर्टाच्या व्हर्च्युअल सुनावणीत वकीलाचे कारनामे! तिच्याकडे पाहिलं, नंतर जवळ खेचलं आणि मग...
Viral Video
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Oct 16, 2025 | 4:11 PM

सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र, सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हिडीओमध्ये चक्क एका वकिलाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान जे काही केले ते पाहून सर्वजण चकीत झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. नेमकं काय झालं? जाणून घ्या..

‘न्याय मंदिरा’शी संबंधित असा एक व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडिया युजर्स थक्क झाले आहेत. हा व्हायरल व्हिडीओ दिल्ली उच्च न्यायालयाच्या व्हर्च्युअल सुनावणीशी दरम्यानचा आहे. या व्हिडीओमध्ये एका वकिलाला लाइव्ह प्रक्षेपणादरम्यान कॅमेर्‍यासमोर एका महिलेला चुंबन घेताना पाहिलं गेलं. वकिलाने पहिल्या त्या महिलेकडे पाहिलं. नंतर तिला स्वत:कडे खेचले आणि मग किस केले. वकिलाच्या कारनाम्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

वाचा: हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड लवकरच देणार गूडन्यूज, सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट

नेमकं काय घडलं?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही धक्कादायक घटना तेव्हा घडली, जेव्हा दिल्ली उच्च न्यायालयाचं व्हर्च्युअल सत्र सुरू होणार होतं. सर्वजण न्यायमूर्तींच्या येण्याची वाट पाहत होते. पण आपल्या खोलीत बसलेले वकील साहेब कदाचित हे विसरले की त्यांचा कॅमेरा सुरू आहे, आणि ते लाइव्ह आहेत. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की वकिलाजवळ एक महिला उभी आहे, जिचा हात पकडून ते तिला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. महिला थोडी घाबरते, तेव्हाच वकील साहेब तिच्या गालाचं चुंबन घेतात. त्यानंतर महिला तात्काळ मागे हटते. हा ‘रोमान्स’ कॅमेर्‍यात कैद झाला आणि आता इंटरनेटवर आगीसारखा पसरला आहे.

हे फुटेज सोशल मीडियावर समोर येताच, कमेंट्सचा पूर आला. लोकांनी ही लज्जास्पद कृती पाहून न्यायपालिकेच्या मर्यादेचा आणि ऑनलाइन सुनावणीच्या प्रोटोकॉलचे गंभीर उल्लंघन आहे असे म्हटले.

कारवाईची मागणी, मोठे प्रश्न उपस्थित

एक युजरने या व्हिडीओवर टोमणा मारत म्हटलं, हे आहे डिजिटल इंडिया. न्यायमूर्ती स्ट्रीम करतात आणि वकील मीम बनतात. दुसर्‍याने कमेंट केली की, जेव्हा तंत्रज्ञान आणि परंपरेचा मेळ होतो आणि कॅमेरा बंद करण्याचं बटण केस हरवतं. मात्र, या व्हिडीओच्या सत्यतेची पुष्टी होणं बाकी आहे. पण जर हा फुटेज खरा आढळला, तर वकिलाविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते.