Sindhudurg : गोमूच्या खेळावरही पुष्पाचा Fever; हौशी कलाकार Srivalli गाण्यावर धरतायत ठेका!

कोकणात होळी सण उत्साहाने साजरा केला जातो. या सणाचे वैशिष्ट्य म्हणजे दारात येणारे गोमूचे खेळ किंवा नाच. सध्या पुष्पा (Pushpa) चित्रपटातल्या श्रीवल्ली (Srivalli) गाण्याचा फिवर (Fever) सर्वत्र दिसून येत आहे. गोमू नाच सर्वानाच आवडला असून सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Sindhudurg : गोमूच्या खेळावरही पुष्पाचा Fever; हौशी कलाकार Srivalli गाण्यावर धरतायत ठेका!
गोमूच्या खेळात श्रीवल्ली गाण्यावर नाचताना कलाकार
Image Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Mar 24, 2022 | 12:46 PM

सिंधुदुर्ग : कोकणात होळी सण उत्साहाने साजरा केला जातो. या सणाचे वैशिष्ट्य म्हणजे दारात येणारे गोमूचे खेळ किंवा नाच. गावागावातील हौशी कलाकार मंडळी गोमूचे नाच करून सर्वांचे मनोरंजन करत असतात. खरेतर गोमूच्या या नाचात जुन्या लोकगीतांचा वापर केला जातो. मात्र सध्या पुष्पा (Pushpa) चित्रपटातल्या श्रीवल्ली (Srivalli) गाण्याचा फिवर (Fever) सर्वत्र दिसून येत आहे. मग तो दशावतार असो किंवा भजनाचा कार्यक्रम. कणकवली तालुक्यातील एका गोमूने आपल्या नाचाच्या कार्यक्रमात या गाण्याचा समावेश केला आहे. त्यांचा हा गोमू नाच सर्वानाच आवडला असून सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. गोमूमुळे तर मनोरंजन होतेच. आता त्यात श्रीवल्ली गाण्याने अधिकच रंग चढवला आहे. चला तर मग पाहू या तळकोकणातला पुष्पा गोमू.

भजनही झाले होते व्हायरल

श्री वडची देवी प्रासादिक भजन मंडळाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये आपल्याला श्रीवल्ली गाणे ऐकायला मिळाले. अस्सल मराठमोळ्या स्टाइलमध्ये हे गाणे ते गात असल्याचे दिसून आले होते. मात्र ते गाण्याच्या स्वरुपात नाही, तर भजनाच्या स्वरुपात ते गात होते. भजनाला श्रीवल्ली गाण्याची चाल लावून ते सादर करताना आपल्याला दिसून आले होते. देवगड तालुक्यातल्या लिंगडाळ या ठिकाणचं हे भजनी मंडळ होते.

डबलबारीतही श्रीवल्ली

एका यूट्यूब चॅनेलवर 25 जानेवारीला एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. इतकेच काय तर फेसबुकवरच्या अनेक मालवणी पेजेसवरूनही व्हिडिओ व्हायरल झाला. सोबतच कोकणातल्या व्हॉट्सऍपग्रुपवरही हा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला होता. ही डबलबारी नेमकी कुठे झाली, याची माहिती मिळू शकलेली नसली, तर व्हिडिओच्या मागे दिसणाऱ्या बॅनरमध्ये श्रीवल्ली सादर करणारे बुवा हे मात्र कुडाळमधीलच एखाद्या गावातील असल्याचे दिसून आले होते.

आणखी वाचा : 

VIDEO | ऐरे गैरे नथ्थू खैरे, यांना वाटतं सात-बाराच पक्का झालाय, Beedमध्ये काका जयदत्त क्षीरसागर पुतण्यावर का संतापले?

“विवेक अग्निहोत्रींना राज्यसभेत पाठवा, नाहीतर ते…”; The Kashmir Files वर काश्मिरी नेत्याचं मोठं विधान

Video Bhandara | डॉक्टर की हैवान! चपराशाला अमानुष मारहाण, गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार