एका डुलकीने झाला मोठा घात! क्लार्ककडून 3000 कोटी ट्रान्स्फर, बँकेने जे केले ते त्याहून…

जर्मनीत सुमारे 12 वर्षांपूर्वी एका बँकेत एक थकलेला क्लर्क काम करताना कीबोर्डवर झोपला. या चुकामुळे एका व्यक्तीला 64.20 युरोऐवजी तब्बल 222 दशलक्ष युरो ट्रान्सफर झाले. यानंतर बँकेने क्लर्कवर कारवाई केली.

एका डुलकीने झाला मोठा घात! क्लार्ककडून 3000 कोटी ट्रान्स्फर, बँकेने जे केले ते त्याहून…
Sleeping on keyboard
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 03, 2025 | 4:44 PM

जर्मनीत सन 2012 मध्ये घडलेली ही विचित्र घटना आता इंटरनेटवर व्हायरल होत आहे. एक थकलेला बँक क्लर्क काम करताना कीबोर्डवर झोपला. झोपेत त्याच्याकडून कीबोर्डची बटणे दाबली गेली. या चुकीमुळे एका व्यक्तीला 64.20 युरोऐवजी 222,222,222.22 युरो म्हणजेच 222 दशलक्ष युरो (सुमारे 2000 कोटी रुपये) ट्रान्सफर झाले. बँकेने यानंतर क्लर्कवर कारवाई केली. सुदैवाने, दुसऱ्या एका कर्मचाऱ्याने वेळीच या प्रचंड मोठ्या व्यवहाराला पकडले आणि ते दुरुस्त केले, ज्यामुळे हा व्यवहार पूर्ण झाला नाही.

सुपरवायझरची नोकरी गेली

क्लर्कने केलेल्या या चुकीकडे सुपरवायझरनेही लक्ष दिले नाही आणि त्याने हा व्यवहार मंजूर केला. व्यवहाराची तपासणी करण्याची जबाबदारी सुपरवायझरची होती, त्यामुळे बँकेने या मोठ्या चुकीसाठी त्याला जबाबदार ठरवत तात्काळ नोकरीवरून काढून टाकले. यानंतर हे प्रकरण जर्मनीच्या लेबर कोर्टापर्यंत पोहोचले.

वाचा: गर्दीचा फायदा घेत नको तिकडे करत होता स्पर्श, नंतर जे घडलं… मुलींनी तर हा व्हिडीओ पाहायलाच हवा

कोर्टाने सुपरवायझरला पुन्हा नोकरीवर घेण्याचा आदेश दिला

जर्मनीच्या हेस्से राज्यातील न्यायालयाने सुपरवायझरला नोकरीवरून काढण्याचा निर्णय चुकीचा ठरवला. न्यायालयाने म्हटले की, ही चूक क्लर्कने जाणीवपूर्वक केलेली नव्हती आणि ती केवळ निष्काळजीपणाचा परिणाम आहे. न्यायाधीशांनी हेही मान्य केले की, सुपरवायझरला दररोज शेकडो कागदपत्रांची तपासणी करावी लागायची. घटनेच्या दिवशी त्यांनी 812 कागदपत्रांची तपासणी केली होती आणि प्रत्येक कागदपत्रासाठी फक्त काही सेकंदांचा वेळ मिळाला होता.

न्यायालयाने बँकेच्या अपेक्षा अव्यवहार्य ठरवल्या आणि म्हटले की, अशा चुका रोखण्यासाठी स्वयंचलित त्रुटी-शोध प्रणालीचा अभावही समस्येचा एक भाग होता. न्यायालयाने निकाल दिला की, सुपरवायझरला केवळ इशारा द्यायला हवा होता, नोकरीवरून काढून टाकणे योग्य नव्हते.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

ही घटना समोर आल्यानंतर बँकेच्या कार्यपद्धतीतील त्रुटींवर चर्चा तीव्र झाली. अनेकांनी म्हटले की, जर बँकेत चांगली सुरक्षा प्रणाली असती, तर इतकी मोठी चूक टाळता आली असती. काहींनी असेही म्हटले की, असामान्यपणे मोठ्या व्यवहारांना अनेक स्तरांवर मंजुरीची गरज असते, ज्यामुळे अशी गडबड पकडली जाऊ शकते आणि जोखीम कमी होते. काहींनी या चुकीसाठी बँक क्लर्कला जबाबदार ठरवले आणि काम करताना झोपणे ही गैरजबाबदार कृती असल्याचे म्हटले, तर काहींनी कामाच्या दबावामुळे अशी चूक कोणाकडूनही होऊ शकते असे मत व्यक्त केले.