Twitter Memes : शेतकरी आंदोलनात चप्पल गायब,आता सोशल मीडियावर ट्रेंड

| Updated on: Dec 07, 2020 | 6:18 PM

आता ट्विटरवर चर्चा सूरू आहे ती म्हणजे एका बाईच्या सँडल बाबतीत.(Slippers lost in farmers' movement, now trend on social media)

Twitter Memes : शेतकरी आंदोलनात चप्पल गायब,आता सोशल मीडियावर ट्रेंड
Follow us on

मुंबई : सोशल मीडियाच्या जगात कुठली गोष्ट ट्रेंड होईल सांगता येत नाही. आता तुम्ही म्हणाल की इंटरनेटच्या जगाबद्दल हिच तर एक आश्चर्यदायक बाब आहे की प्रत्येक लहान गोष्ट येथे विशेष बनते, तर काही विशेष गोष्ट किरकोळ ठरतात. आता आजच्याच ट्रेंडकडे पाहा, आता ट्विटरवर चर्चा सूरू आहे ती म्हणजे एका बाईच्या सँडल बाबतीत. आता तुम्हाला संपूर्ण प्रकार सांगतो.

काय आहे प्रकरण ?
आता सोशल मीडियावर एका महिला शेतकरी नेत्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. शेतकरी चळवळीत सामील झालेल्या या महिला नेत्या गीता भाटी यांची चप्पल गायब झालीये. त्यामुळे गीता भाटी यांनी चक्क सरकारवर चप्पल गायब करण्याचा आरोप केला आहे. ‘सरकार आणि पोलिसांच्या कारस्थानात माझी चप्पल गायब झाली आहे.’ आता महिला नेत्याचा आरोप इतका अनोखा असेल, तर सोशल मीडियावर चर्चा तर होणारच.

‘माझी चप्पल सरकार आणि पोलिसांमुळे हरवली आहे. सरकारनं माझी चप्पल परत घ्यावी.’ गीता भाटी यांचा असं म्हणतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. त्यानंतर # गीता_भाटी_का_सँडल_बॅक_ कॅरो असं हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड झालं आणि ट्विटरवर जबरदस्त मीम्स शेअर केले गेले. हे मीम्स इतकी मजेदार आहेत की तुम्हीली बघून हसाल.