AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | बोबड्या भाषेत बाळ म्हणतेय आई…आई… व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर छोट्या बाळांचे मजेदार व्हिडीओ अपलोड केले जातातॉ. सध्या तर झोपलेल्या बाळाचा एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video | बोबड्या भाषेत बाळ म्हणतेय आई...आई... व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
small baby viral lvideo
| Edited By: | Updated on: Jun 30, 2021 | 11:47 PM
Share

मुंबई : मुलं ही देवाघरची फुलं असतात. त्यांच्या हसण्यामुळे, रडण्यामुळे घराला घरपण येतं असं म्हटलं जातं. या जगात प्रत्येकाने आपल्या अवतीभोवती एकदातरी छोट्या बाळाची उपस्थिती अनुभवली असेल. लहान बाळांच्या गोड आणि खट्याळ बोलण्याने तसेच त्यांच्या निरागसतेचे नेटकरीसुद्धा वेडे होतात. कदाचित याच कारणामुळे  छोट्या बाळांचे मजेदार व्हिडीओ अपलोड केले जातात. सध्या तर झोपलेल्या बाळाचा एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (small baby sleeping and calling his mother funny video goes viral on social media)

बाळ झोपल्यामुळे निपचित पडलेय

सध्या एक अतिशय मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक गोड, छोटेसे बाळ झोपले असल्याचे दिसतेय. हे बाळ झोपल्यामुळे ते निपचित पडलेय. व्हिडीओमध्ये हे बाळ शांत झोपून राहील असे आपल्याला वाटते.

बोबडे बोल बोलत बाळ म्हणतेय आई..आई…

मात्र, व्हिडीओतील बाळ झोपेमध्येसुद्धा खट्याळपणा करते आहे. हे बाळ झोपेत आपल्या आईला बोलवते आहे. आई… आई म्हणत असल्याचे आपल्याला या व्हिडीओमध्ये दिसते आहे. अतिशय निरागस भाव ठेवून हे लहान बाळ आपल्या आईला बोलवते आहे. हाच प्रसंग मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर तो चांगलाच चर्चाचा विषय ठरतो आहे. लोक हा व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत. तसेच या व्हिडीओवर नेटकरी मजेदार कमेंट्स सरत असून त्याला मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती समजू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला @RexChapman या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video | भरधाव वेगात आलेल्या कारची रिक्षाला धडक, काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

पाणी साचलेल्या रस्त्यावरुन चालणे कठीण, नवरीला थेट खांद्यावर उचललं, नवरदेवाची एकच चर्चा

अंबरनाथचा ‘सिलेंडर मॅन’ रातोरात बनला स्टार, सोशल मीडियावर व्हायरल सागर जाधवची हवा!

(small baby sleeping and calling his mother funny video goes viral on social media)

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....