पाणी साचलेल्या रस्त्यावरुन चालणे कठीण, नवरीला थेट खांद्यावर उचललं, नवरदेवाची एकच चर्चा

सध्या एका नव्या नवरी-नवरदेवाला अशाच एका अडचणीला तोंड द्यावे लागले आहे. रस्त्यात पाणी साचल्यामुळे नवरदेवाला आपल्या नवरीला घरी घेऊन जाताना चक्क खांद्यावर उचलून घ्यावे लागले आहे.

पाणी साचलेल्या रस्त्यावरुन चालणे कठीण, नवरीला थेट खांद्यावर उचललं, नवरदेवाची एकच चर्चा
नवरदेवाने नवरीला अशा प्रकारे खांद्यावर उचलले.
Follow us
| Updated on: Jun 30, 2021 | 12:17 AM

मुंबई : पावसाळा सुरु असल्यामुळे देशात अनेक ठिकाणी पाऊस कोसळतो आहे. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. तसेच नद्यांना पूर आल्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते पूर्णपणे पाण्याने भरले आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो आहे. सध्या एका नव्या नवरी-नवरदेवाला अशाच एका अडचणीला तोंड द्यावे लागले आहे. रस्त्यात पाणी साचल्यामुळे नवरदेवाला आपल्या नवरीला घरी घेऊन जाताना चक्क खांद्यावर उचलून घ्यावे लागले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (groom crossing river while carrying bride on shoulder video went viral on social media)

नवरीकडे हात करत थेट खांद्यावर उचलले

मिळालेल्या माहितनुसार सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा उत्तर बिहारमधील किशनगंजमधील आहे. किशनगंज येथील कनकई नदीवरील पलसा घाटावरील हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये एक नवरी जहाजामधून उतरताना दिसते आहे. मात्र पाण्यामधून चालणे अशक्य असल्यामुळे नवरदेवाने नवरीकडे हात करुन तिला थेट उचलले आहे. तसेच नवरीला खांद्यावर घेत हा नवरदेव नदी ओलांडतो आहे.

नदीच्या परिसरात सगळीकडे पाणीच पाणी

नवदेव हा लोहागाडा गावातील असून तो आपल्या नवरीला पलसा गावातून घेऊन येत होता. मात्र, याच वेळी येताना पाऊस जास्त प्रमाणात बरसल्यामुळे नदीच्या परिसरात सगळीकडे पाणीच पाणी साचले आहे. परिणामी नवरदेवाला नवरीला खांद्यावर उचलून घ्यावे लागले.

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लोकांनी या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक केले असून वेगवेगळ्या समाजमाध्यमांवर हा व्हिडीओ शेअरसुद्धा केला जात आहे.

इतर बातम्या :

अंबरनाथचा ‘सिलेंडर मॅन’ रातोरात बनला स्टार, सोशल मीडियावर व्हायरल सागर जाधवची हवा!

Video | मांस फस्त करण्यासाठी वाघांची धडपड, हवेत झेप घेताच थेट पाण्यात पडले, पाहा व्हायरल व्हिडीओ

Video | रस्ता ओलांडण्यासाठी मुलांची धडपड, मध्येच ट्रक आला अन् घोळ झाला, पाहा नेमकं काय घडलं ?

groom crossing river while carrying bride on shoulder video went viral on social media

Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.