Snake Blood Group : सापांमध्ये रक्तगट असतो? काय सांगतं विज्ञान, तुम्ही पण आश्चर्यचकीत व्हाल

Snake Blood Group : साप म्हटलं की आपल्याला भीती वाटणं स्वाभाविक आहे. कारण साप चावला तर मृत्यू ओढावतो हा समज दृढ आहे. बिनविषारी साप चावण्याचा धक्का पण अनेकांना सहन होत नाही. सापाच्या विषाइतकेच त्याचे रक्तही अमूल्य असते हे तुम्हाला माहिती आहे का?

Snake Blood Group : सापांमध्ये रक्तगट असतो? काय सांगतं विज्ञान, तुम्ही पण आश्चर्यचकीत व्हाल
सापाचा रक्तगट कोणता?
| Updated on: Aug 08, 2025 | 1:37 PM

सापाच्या विषाइतकेच त्याचे रक्त ही अमूल्य असते असे म्हटले तर तुम्ही त्या व्यक्तीला वेड्यात काढाल. साप म्हटलं की सर्वात पहिले भीती वाटते. साप चावला तर मृत्यू ओढावतो असे आपल्या मनावर बिंबीत आहे. त्यामुळे बिनविषारी साप चावला तरी अनेकांचा धक्क्यानेच मृत्यू ओढावतो. सापाचे विष घातक असते. त्यापासूनच लस तयार करण्यात येते. पण केवळ विषच नाही तर रक्ताचाही लस तयार करण्यासाठी वापर होतो, असे म्हटलं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. पण सापांना मनुष्याप्रमाणे रक्तगट असतो का? विज्ञान काय सांगते?

सापाचा रक्तगट असतो का?

तर याचं उत्तर थोडं विचित्र वाटेल. सापांमध्ये मनुष्यांप्रमाणे A, B, AB,O असा रक्तगट नसतो. हा पण रक्तगट सदृश व्यवस्था असते, असे विविध माहिती स्त्रोतावरून कळते. साप हा शीतरक्ती, थंड रक्ताचा (cold blooded) रक्त गटातील प्राणी आहे. त्याचं रक्त लालच असतं. हिमोग्लोबिन जास्त असल्याने ते लालचटक दिसतं. सापाचा रक्तगट हा माणसांप्रमाणे वर्गीकृत नाही. ती एक रक्तगट सदृश व्यवस्था आहे. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर सापाचा रक्तगट असा प्रश्न वेडगळ ठरतो. हा पण त्याच्या रक्तातही विशिष्ट जैविक वैशिष्ट्य असतं. सापाच्या रक्तात अँटीबॉडीज, विष प्रतिजैविकांसाठीचे घटक आढळतात. सापाच्या विषाच्या आधारे लस तयार करण्यात येते. त्यात त्याच्या रक्ताचाही वापर होतो. त्याआधारे अँटीबॉडीज तयार करण्यात येतात. त्यावेळी सापाच्या रक्तातातील काही घटकांची क्षमता तपासण्यात येते. काही सापांच्या रक्तात अँटीबॅक्टेरियल अथवा रक्त गोठण्यास प्रभावित करणारे घटक आढळतात.

सापांचा रक्त समूह

आतापर्यंत झालेल्या संशोधनानुसार, सापांमध्ये ABO प्रणाली नसते, परंतु त्यांच्याकडे वेगवेगळे अँटीजेन्स असतात. जे त्यांना वेगवेगळ्या रक्तगट सदृश प्रणालीत वर्गीकृत करतात.सापांच्या रक्तगटांचा अभ्यास अजूनही सुरू आहे आणि त्यांच्या रक्तगटांबद्दल अद्याप बरेच काही अज्ञात असल्याचे विज्ञान सांगते. काही अभ्यासांमध्ये, काही सापांमध्ये काही रक्तगट इतरांपेक्षा जास्त आढळून आले आहेत. उदाहरणानुसार, काही अभ्यासांमध्ये, काही सापांमध्ये DEA 4 आणि DEA 6 रक्तगट सदृश अधिक प्रमाणात आढळून आले आहेत.

सापांमध्ये मानवांप्रमाणे ABO रक्तगट प्रणाली नाही. परंतु त्यांच्या रक्तात विविध अँटीजन्स असतात, त्यांना वेगवेगळ्या रक्तगटांमध्ये वर्गीकृत करतात. हे अँटीजन विविध प्रकारे ओळखले जातात आणि त्यांचे वर्गीकरण करण्यात येते. काही सापांमध्ये एका विशिष्ट प्रकारचा रक्तगट सदृश प्रणाली असते. तर काहीं सापांच्या प्रजातीत याविषयीचे संशोधन सुरू आहे.

(डिस्क्लेमर : ही विविध उपलब्ध स्त्रोतावरील माहिती आहे. टीव्ही 9 दुजोरा देत नाही.)