ट्रम्प होणार बिहारी बाबू! टॅरिफ वादात थेट रहिवाशी प्रमाणपत्रासाठी अर्ज, प्रशासनाची एकच धांदल, मग ते सत्य आले समोर
Donald Trump in Bihar : तर सध्या डोनाल्ड ट्रम्प हे भारतावर नाखूष आहेत. त्यांचा गेल्या काही दिवसांपासून राग राग राग सुरू आहे. त्यातच आता बिहारवरून एक मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या नावे थेट रहिवाशी प्रमाणपत्रासाठी अर्ज आला आहे.

डोनाल्ड ट्रम्प हे भारतावर नाराज आहेत. त्यांनी भारताविरोधात टॅरिफ वॉर छेडले आहे. त्यांनी भारतविरोधी राग आळवला आहे. त्यातच आता बिहारवरून एक मोठी बातमी समोर येत आहे. बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यात त्यांच्या नावे प्रशासनाकडे रहिवाशी दाखल्यासाठी अर्ज आला होता. या अर्जावर डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो आणि संपूर्ण नाव होते. त्यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली. हा अर्ज ऑनलाईन करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यानंतर मग प्रशासनाने मोठी भूमिका घेतली.
ट्रम्प यांचा रहिवाशी दाखल्यासाठी अर्ज
समस्तीपुरा जिल्ह्यातील मोहिउद्दीनगर भागात ही घटना समोर आली. येथे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने रहिवाशी दाखल्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यात आला. हा अर्ज पाहुन कोणीतरी खोडळसाळपणा केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर हा अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर प्रशासनाने सायबर शाखेकडे याप्रकरणी तक्रार दिली.
29 जुलै 2025 रोजी मोहिउद्दीनगर मधील अंचल येथील सार्वजनिक सेवा केंद्रावरून हा अर्ज करण्यात आला. रहिवाशी प्रमाणपत्रासाठी हा अर्ज करण्यात आला होता. या अर्जदाराचे नाव डोनाल्ड जॉन ट्रम्प असे लिहिलेले होते. या अर्जासोबत एक फोटो पण लावण्यात आला होता. यामध्ये पत्ता दिला होता. वॉर्ड क्रमांक 13, पोस्ट बाकरपूर, गाव हसनपूर, तालुका मोहिउद्दीननगर आणि जिल्हा समस्तुपुर असा पत्ता दिला होता. त्यासोबत एक ई-मेल आयडी होता. अंचल प्रशासनाकडे हा अर्ज प्राप्त झाला होता. हा अर्ज कोणतीतरी मुद्दामहून पाठवल्याचे आणि हा खोडसाळपणा असल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाने हा अर्ज फेटाळला.
या अर्जासोबत डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो, आधार संख्या, बारकोड आणि पत्ता आढळून आला. पण हा सर्व बोगसपणा असल्याची माहिती समोर आली. 4 ऑगस्ट 2025 रोजी महसूल अधिकारी सृष्टी सागर यांनी हा अर्ज फेटाळला. निवडणूक आयोगाने सध्या तिथे मतदार याद्यांमध्ये सुधारणा कार्यक्रम सुरू केला आहे. त्याविरोधात प्रशासनाची फिरकी घेण्यासाठी असा प्रकार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरानंतर प्रशासनाने अज्ञात व्यक्तीविरदात सायबर शाखेत प्राथमिक तक्रार नोंदवली. आता सायबर पोलीस हा अर्ज कोणत्या ठिकाणाहून आणि कोणी पाठवला याचा तपास करत आहे. असा अर्ज पाठवणाऱ्याचा हेतू हा केवळ गंमतीचा होता की त्यामागे प्रशासनाला बदनाम करण्याचा प्रयत्न होता याचा तपास करण्यात येत आहे.
