Ajit Pawar : निर्व्यसनी राहा… संध्याकाळ झाली की गेला चंद्रावर, असं नको… अजितदादांनी भरला सज्जड दम
Ajit Pawar Statements : अजित पवार बीड दौऱ्यावर होते. त्यांनी येथे अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. तर दादा आले म्हणून अनेक ठिकाणी प्रशासनाची धावपळ दिसली. इतकेच नाही तर राजकीय घडामोडी घडल्या. त्याचवेळी दादांनी असा कडक सल्ला दिला.

अजित पवार बीड दौऱ्यावर होते. मग प्रशासनाच्या धांदलीच्या आणि धावपळीच्या बातम्यांनी अनेकांचे मनोरंजन झाले. दादांनी यावेळी काही राजकीय डावही टाकले. विकासाच्या कामांची रेलचेल दिसली. पण खमक्या स्वभावासाठी प्रसिद्ध असलेल्या दादांनी या दौऱ्यात चिमटे काढले नाहीत, असे झाले नाही. त्यांनी शाब्दिक फटकेबाजी केली. त्यांचा निशाणा जिथे लागायचा तिथे अचूक लागला, हे दादांचे वैशिष्ट्यच आहे. ते येडगावला सांगून पेडगावला जात नाहीत. ते थेट मुद्दावर येतात. त्यामुळे मग भल्याभल्यांची त्रेधात्रिपीट उडते. या दौऱ्यात दादांनी मद्यपींचे असे कान टोचले.
मराठवाड्याचे प्रश्न सोडवणार
अजित पवार यांनी बीडमधील भाषण मराठवाडा आणि बीड जिल्ह्यातील प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. आजच्या पक्ष प्रवेशाला पावसाने देखील मनापासून साथ दिली.मला उशीर झाला म्हणून दिलगिरी व्यक्त करतो. मधल्या काळाच प्रकाश साहेबांनी पाणी सोडायला सांगितलं.आपल्या भागातील प्रश्न कसं सुटतील कितीही कामं झाली तरी नवी कामं लोक देत असतात. तरुण पिढीला अभिमान वाटावा त्यांचं रक्त खवळलं पाहिजे असा महाराजांचा इतिहास. आज आपण राज्यात आपण वेगळ्या विचारांनी, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं समाजकारण करत भूमिका आहे.साधूसंतांचे आशिर्वाद आहेत, असे अजितदादा म्हणाले.
जेव्हापासून बीडचा मी पालकमंत्री झालेलो आहे जातीपातीचा विचार न करता बीडचं कसं भलं होईल. तरुण तरुणींना काम कसं मिळेल, याचा विचार असतो. सकाळी 5.30 ला माझी सकाळ सुरू होते. उद्या खेड तालुक्यात सकाळी 6 ला चाकणच्या परिसरात जायचं आहे. शेवटी भाषणं कुणीही करू शकतो पण शेतकऱ्यांना मदत करणं. त्यांच्या शिवारात जाणं हे काम आम्ही केलं. माझ्या बीड जिल्ह्यातले प्रश्न सोडविण्यासाठी राज्य, केंद्राच्या मदतीने काम करतोय. भाषणाने शेतकऱ्यांची शेतं ओली होणार नाहीत. त्यासाठी शेतात पाणी दिलं पाहिजे आणि ते काम करणार असल्याचे ते म्हणाले.
कोणी आका असो की फाका, माफ करणार नाही
मी 30 व्या वर्षी खासदार झालो. 6 वेळा उपमुख्यमंत्री झालो एकच ध्यास की या आपल्या राज्याचं भलं झालं पाहिजे. पुणे जिल्हा किंवा पश्चिम महाराष्ट्र सुधारून नाही चालणार माझी सगळी भावंडं ही पुढे गेली पाहिजेत. मी बाबरीचं भाषण ऐकलं. कधी कधी शेतकरी नाईलाजाने आकडे टाकायचे. राज्याच्या तिजोरीतून 45 हजार कोटी रुपये आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना देत आहोत.
नगरपालिका, नगरपंचायत, मनपा असेल तिथे आपलं काम झालं पाहिजे. जर एखादा कॉन्ट्रॅक्टर ओळखीचा असला तरी. कारण तो जनतेचा पैसा आहे त्यांच्या बापाचा पैसा नाही. किती वर्ष पिढ्या नि पिढ्या दुसऱ्यांचे तुम्ही ऊस काढत बसणार जरा आत्मचिंतन करा. कुणी मोठ्या बापाचा चुकला तरी त्याला शासन केल्याशिवाय राहणार नाही पाय घसरत असेल तर सावरा सुधरा. मोठ्या बापाचा चुकला तरी त्याला माफ करणार नाही. कुणी आका असु नाही तर फाका असो, असा सज्जड दम दादांनी यावेळी भरला.
निर्व्यसनी राहा, नीट संसार करा
चांगल्या कामाला मी रात्री 12 ला देखील येईल. माझ्या ओळखीचा कॉन्ट्रॅक्टर असला तरी कामात चुक असल्यास काळ्या यादीत टाकतो. आम्ही बीड विमानतळाचा प्रश्न मार्गी लावतोय. नरेंद्र मोदी यांच्याकडून 20 लाख घरं मंजुर करून आणलेत. निर्व्यसनी राहा, नीट संसार करा, चांगल्या सवयी लावा ही काळाची गरज आहे. बीड जिल्ह्याकडे बघण्याचा दृष्टीकोन काय आहे.
निर्व्यसनी राहा. संध्याकाळ झाली तर गेला चंद्रावर, असं करू नका. आता तरी सुधारा. ब्रम्हदेव आला तरी ते काही करू शकणार नाही. चुकीच्या रस्त्याने कोणी गेलं तर त्याला योग्य रस्त्यावर आणा. ही काळाची गरज आहे, हे केलं पाहिजे आज आपल्या बीड जिल्ह्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे. याचं आत्मचिंतन करा कोण चुकतंय मोठ्या बापाचा चुकला तरी त्याला शासन केल्याशिवया राहणार नाही आका असो वा फाका असो आम्हाला घेण देण नाही, हे चालणार नाही असे अजितदादांनी ठणकावले. कायदा सगळ्यांनाच समान अजित पवार असो. अजून पाय घसरत असेल तर सावरा आता काय उपमुख्यमंत्री जवळचा आहे माझं कोण काय करेल मुख्यमंत्रीच तुझा बंदोबस्त करेल, असे दादांनी ठणकावले.
काही वर्षांपूर्वी धाराशिवला काय झालं माहित आहे का. चुकीच्या प्रवृत्ती फाडल्या पाहिजेत मी सांगितलं एसपींना सांगितलंय एखादा एकदा चुकला दोनदा चुकला चौथ्यांदा चुकला तर त्याला मकोका लावा, मग करू दे चक्की पिसिंग अँड पिसिंग, असा टोला त्यांनी लगावला. दिलेला पैसा हा सत्कारणी लावा. ज्या आपल्या गरजा आहेत जे आपले मोठे मोठे प्रश्न आहेत ते पूर्ण करायचा. ज्यांची नावं घेतली नाहीत त्यांनी वाईट मानून घेऊ नका. तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडा आम्ही तुमची सर्व कामं करतो हा शब्द देतो, असे दादांनी स्पष्ट केले.
