व्हिडीओ मधील दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात, कानात फिरतोय कोळी!
यात कॅमेऱ्यासमोर एका महिलेचा कान दिसत असून त्यानंतर कॅमेरा झूम करून काही तरी पाहायला मिळतं.

कान शरीराचे सर्वात संवेदनशील भाग मानले जातात. अनेक वेळा असे दिसून येते की काही जीव किंवा प्राणी कानात प्रवेश करतात आणि ते खूप त्रासदायक असतात. एका महिलेच्या कानात एक कोळी शिरला तेव्हाचा एक व्हिडिओ समोर आलाय, हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय. यावर खूप लोक प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ तुम्हाला थोडासा विचलित करू शकतो.
खरंतर हा व्हिडिओ अनेक युझर्सनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात कॅमेऱ्यासमोर एका महिलेचा कान दिसत असून त्यानंतर कॅमेरा झूम करून काही तरी पाहायला मिळतं. होय! हा एक कोळी आहे जो त्या महिलेच्या कानात फिरतोय.
हा कोळी एखाद्या रस्त्यावर फिरत असल्यासारखा या महिलेच्या कानात फिरतोय. सुदैवाने या कोळ्याला बाहेर काढण्यात आले.
Imagine finding out this is what’s causing your earache ?? pic.twitter.com/KV1aYdTXkM
— LADbible (@ladbible) December 13, 2022
कोळी इतका लहान होता की तो अगदी सहज कानात शिरलाय आणि अगदी सहज बाहेर सुद्धा आलाय. यावर अनेक जण प्रतिक्रियाही देत आहेत.
असा व्हिडीओ तुम्ही कधीच पाहिला नसेल. एखादा कीटक जर कानात फिरत असेल आणि त्याचा व्हिडीओ बघायला मिळाला तर? हे किती भयानक आहे. असंवेदनशील भागात माणसाला जराही दुखणं सहन होत नाही. हा व्हिडीओ पाहून तर लोकांना काही आपल्या कानात काही नसून सुद्धा त्रास होऊ शकतो.
