शिक्षिकेने विचारले, प्रदूषणपासून कसा बचाव करता येईल? विद्यार्थ्यांने दिले असे उत्तर की तुम्हाला हासणे थांबवता येणार नाही
व्हायरल झालेली उत्तरपत्रिका Bittu Sharma Jokes या इंस्टाग्राम अकाउंटवरुन अपलोड करण्यात आली आहे. ही उत्तर पत्रिका कोणत्या शहरातील आहे, त्याची माहिती दिलेली नाही. पण ही पोस्ट हजारो जणांनी पाहिली असून त्याला लाइक केले आहे.

Funny Answer Sheet: परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील सर्वात महत्वाचा भाग असतो. या परीक्षेत विद्यार्थी अनेक वेळा विचारलेल्या प्रश्नांना चमत्कारीक उत्तर देत असतात. सध्या सोशल मीडियावर एक असाच प्रश्नाचे उत्तर व्हायरल होत आहे. हे उत्तर वाचून तुम्हालाही धक्का बसणार आहे. तुम्हाला हासावे की खेद व्यक्त करावा, हे समजणार नाही. या मुलाची उत्तरपत्रिका व्हायरल झाली आहे. त्या उत्तर पत्रिकेत प्रदूषणपासून कसा बचाव करता येईल? या प्रश्नाचे गजब उत्तर त्या विद्यार्थ्याने दिले आहे.
काय दिले उत्तर
व्हायरल झालेल्या उत्तरपत्रिकेत मुलाने प्रदूषणापासून वाचण्याचा उपाय दिला आहे. त्याने दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, “गाड़ियों से निकलने वाला धुआं और फैक्ट्री से निकलने वाला पानी और प्रदूषित हवा कम हो जाए तभी प्रदूषण से बचा जा सकता है…”




View this post on Instagram
यापुढे मात्र त्या विद्यार्थ्याने कमाल केली आहे. तो उत्तरात लिहितो की, “बहुत प्यार करते हैं तुमके सनम, कसम चाहे ले लो खुदा की कसम, हमें हर घड़ी आरजू है तुम्हारी, होती है कैसी सनम बेकरारी, मिलेंगे जो तुमको तो बताएंगे हम, अगर ये सब सावधानियों बरतेंगे तभी प्रदूषण से बचा जा सकता है.” हिंदी चित्रपटातील हे गाणे त्या विद्यार्थ्याने लिहिले आहे.
व्हायरल झालेली उत्तरपत्रिका Bittu Sharma Jokes या इंस्टाग्राम अकाउंटवरुन अपलोड करण्यात आली आहे. ही उत्तर पत्रिका कोणत्या शहरातील आहे, त्याची माहिती दिलेली नाही. पण ही पोस्ट हजारो जणांनी पाहिली असून त्याला लाइक केले आहे. त्यावर अनेक प्रकारच्या कॉमेंट आल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, भविष्यातील आयएएस अधिकारी. दुसरा म्हणतो, उत्तरपत्रिका वाचल्यानंतर शिक्षक त्या विद्यार्थ्याला शोधत असणार.
हे ही वाचा
युवतीचे धोकादायक धाडस, सरळ झाडाच्या शेंड्यावर चढून केला डान्स, व्हिडिओ व्हायरल