VIDEO : शिक्षकाचा ‘असा’ निरोप समारंभ पाहिलाय? ढसाढसा रडले विद्यार्थी आणि सहकारीही… 

आपल्या सर्वांच्या आयुष्यात शिक्षका(Teacher)चं स्थान नेहमीच सर्वोच्च मानलं गेलं आहे. एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडिया(Social Media)वर खूप व्हायरल होत आहे. यामध्ये एका शिक्षकाच्या निरोपावर सर्वांचे डोळे ओलावले आणि मुले ढसाढसा रडू लागली.

VIDEO : शिक्षकाचा असा निरोप समारंभ पाहिलाय? ढसाढसा रडले विद्यार्थी आणि सहकारीही... 
शिक्षकाचा निरोप समारंभ (सौ. @ragiing_bull - ट्विटर)
| Updated on: Jan 12, 2022 | 5:32 PM

आपल्या सर्वांच्या आयुष्यात शिक्षका(Teacher)चं स्थान नेहमीच सर्वोच्च मानलं गेलं आहे. प्राचीन भारतीय मान्यतेनुसार, शिक्षकाचं स्थान देवापेक्षा वरचं मानलं जातं, कारण तो शिक्षकच आपल्याला योग्य आणि अयोग्य काय ते सांगत असतो, शिकवतो आणि चांगली कृती करण्यास प्रोत्साहन देतो. म्हणूनच शिक्षकांना शिष्याचा खरा मार्गदर्शक म्हटलं जातं. मात्र, आजच्या काळात लोकांना शिक्षकांचं महत्त्व कळत नाही. अनेक ठिकाणी अनेकदा त्यांच्यासोबत मारहाणीच्या बातम्या येत असतात, मात्र काही शिक्षक असे आहेत, की जे त्यांच्या शिक्षणाचा मान राखून देवासारखे पूजले जातात. असाच एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडिया(Social Media)वर खूप व्हायरल होत आहे. यामध्ये एका शिक्षकाच्या निरोपावर सर्वांचे डोळे ओलावले आणि मुले ढसाढसा रडू लागली.

ढसाढसा रडले विद्यार्थी

व्हिडिओमध्ये तुम्ही एका शिक्षकाचा निरोप पाहू शकता. यादरम्यान तो प्रथम सहकारी शिक्षकांना मिठी मारतात आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचे पायही स्पर्श करतात. एका विद्यार्थ्यानं त्यांना पुष्पहार घालून निरोप दिला आणि भेट म्हणून शालही दिली. यानंतर विद्यार्थ्यांकडून शिक्षकाच्या पायाला स्पर्श करण्याची प्रक्रिया सुरू झाली, ती संपण्याचं नावच घेत नव्हती. यावेळी शिक्षकांच्या डोळ्यात अश्रू तरळलेच, शिवाय विद्यार्थीही रडले. निरोपाच्या वेळी नववधू रडताना दिसतात, अशा रीतीने छातीला चिकटून एक विद्यार्थी रडू लागला.

ट्विटरवर शेअर 

हा एक अतिशय भावनिक व्हिडिओ आहे, जो पाहून तुमचे डोळे ओले होतील. हा व्हिडिओ कर्नाटकातील एका सरकारी शाळेचा आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @ragiing_bull या नावानं शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत याला 6 लाख 81 हजारांहून अधिक वेळा पाहिलं गेलंय. तर 44 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइकदेखील केलंय.

भावुक व्हिडिओ

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. एखाद्या शिक्षकाचा असा निरोप तुम्ही क्वचितच पाहिला असेल. तो एक भावनिक क्षण होता. हा व्हिडिओ पाहून अनेकजण भावुक होत आहेत.

Viral : ‘या’ हंसांनी माशांशी मैत्री केलीय की काय? 16 दशलक्षाहून अधिकवेळा पाहिला गेलाय ‘हा’ Video

Viral Video : पक्ष्यांची आपत्कालीन बैठक पाहिलीय का? यूझर्स म्हणतायत, बहुतेक कोविडच्या तिसऱ्या लाटेवर चर्चा सुरू असावी…

लग्नाचं आमंत्रण ते ही सुपरहिरो चित्रपट मिन्नल मुरली स्टाइल? Video Viral