Viral Video : पक्ष्यांची आपत्कालीन बैठक पाहिलीय का? यूझर्स म्हणतायत, बहुतेक कोविडच्या तिसऱ्या लाटेवर चर्चा सुरू असावी…

सोशल मीडिया(Social Media)वर दररोज बरेच व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होतात, त्यापैकी काही खूपच वेगळे असतात. काही व्हिडिओ हसवतात. असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतोय, हा पाहून तुम्हालाही हसू येईल आणि आश्चर्यही वाटेल.

Viral Video : पक्ष्यांची आपत्कालीन बैठक पाहिलीय का? यूझर्स म्हणतायत, बहुतेक कोविडच्या तिसऱ्या लाटेवर चर्चा सुरू असावी...
पक्ष्यांची आपत्कालीन बैठक
प्रदीप गरड

|

Jan 12, 2022 | 1:57 PM

माणसाने कितीही प्रगती केली तरी जगात अशा काही गोष्टी अशा आहेत, ज्या माणसाच्या विचारकक्षेच्या बाहेर असतात, प्राणी (Animals) असो वा पक्षी (Birds), ते त्यांच्या भाषेत काय बोलतात, ते मानवाला क्वचितच कळतं. काही प्राणी आणि पक्ष्यांना त्यांची भाषा माणसाकडून शिकवली जाते, जेणेकरून त्यांना त्यांच्याशी बोलण्यात कोणतीही अडचण येत नाही. उदाहरणार्थ, जर आपण कुत्र्यांबद्दल बोललो, तर मानव त्यांना इतके निष्णात बनवतात की कुत्री मानवाचा एकूणएक शब्द पाळतात. उठण्या-बसण्यापासून ते खाण्या-पिण्यापर्यंत, खेळण्यापर्यंत सर्व काही कुत्र्यांना समजतं. त्याचप्रमाणे, काही पक्षी आहेत, जे मानवाची भाषा समजतात आणि बोलतात, ज्यामध्ये पोपटांचा समावेश आहे.

व्हिडिओ पक्षांचा

सोशल मीडिया(Social Media)वर दररोज बरेच व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होतात, त्यापैकी काही खूपच वेगळे असतात. काही व्हिडिओ हसवतात. असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतोय, हा पाहून तुम्हालाही हसू येईल आणि आश्चर्यही वाटेल. तुम्ही पाहिलं असेल, की जर एखाद्या विषयावर माणसांमध्ये बैठक असेल, तर त्या बैठकीत अनेक लोक जमतात आणि आपले विचार ठेवतात. पण कधी पक्षांची पाहिलीये का? व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुम्हाला याची कल्पना येईल.

पक्षी बोलतायत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की काही पक्षी एका जागी बसून त्यांच्या आवाजात काहीतरी बोलत आहेत. त्यांच्याकडे बघून जणू काही महत्त्वाची बैठक होतेय, असं वाटतं. ते एकमेकांकडे बघून खूप बोलतात आणि काही तरी मान्य केल्यासारखं डोकं हलवतात.

ट्विटरवर शेअर

हा एक मजेशीर व्हिडिओ आहे, जो IPS अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केलाय. कॅप्शनमध्ये लिहिलंय, की ‘भाषा कोणतीही असो, हे स्पष्ट आहे की एका महत्त्वाच्या विषयावर आपत्कालीन बैठक सुरू आहे’. अवघ्या 30 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 42 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेलाय. तर 4 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइकही केलंय.

विषय गंभीर

या पोस्टवर अनेकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूझरनं गंमतीत लिहिलं, की ‘हा विषय गंभीर दिसतोय. तर दुसर्‍या यूझरनंही अशीच कमेंट केलीय, की कदाचित कोविडच्या तिसऱ्या लाटेवरच चर्चा होत असावी.

लग्नाचं आमंत्रण ते ही सुपरहिरो चित्रपट मिन्नल मुरली स्टाइल? Video Viral

कुत्र्याला स्केटिंग करताना पाहिलंय का? हा मजेदार Video सोशल मीडियावर होतोय Viral

सापाशी मस्ती पडली भारी! अंगावर शहारे आणणारा Video होतोय Viral

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें