Viral Video: थाट असावा तर असा… परीक्षेसाठी थेट हेलिकॉप्टरने रवाना; कारण वाचून डोकं पिटाल

परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा थाट... थेट हेलिकॉप्टरने रवाना... मोजले इतके पैसे... कारण वाचून डोकं पिटाल... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या विद्यार्थ्यांची चर्चा... व्हिडीओ पाहून म्हणाल...

Viral Video: थाट असावा तर असा... परीक्षेसाठी थेट हेलिकॉप्टरने रवाना; कारण वाचून डोकं पिटाल
फाईल फोटो
| Updated on: Sep 13, 2025 | 3:53 PM

तुम्ही ऐकलं वाचलं असेल की, विद्यार्थी परीक्षेसाठी स्कुटी, बाईक, कार किंवा आलिशान कारने पोहचले… पण आता तर चार मित्र थेट हेलिकॉप्टरने परीक्षा केंद्रावर पोहोचले आहेत. सध्या त्यांच्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चार विद्यार्थी परीक्षा केंद्रावर हेलिकॉप्टरने का पोहोचले असतील असा प्रश्न तुम्हाला देखील नक्की पडला असेल. त्यामागे कारण देखील फार मोठं आहे. विद्यार्थ्यांनी जर हेलिकॉप्टरची मदत घेतली नसती तर, त्यांचं एक वर्ष वाया गेलं असतं. आता हेलिकॉप्टर आणि वर्षाचा काय कनेक्शन असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल.. तर चार मित्रांनी असं का केलं जाणून घेऊ…

सांगायचं झालं तर, चार विद्यार्थी उत्तराखंड येथील मुक्त विद्यापीठातून B.Ed चं शिक्षण घेत आहेत. दरम्यान, त्यांना शेवटच्या सेमिस्टरच्या परीक्षेसाठी उत्तराखंड येथील मुनस्यारी येथे जायचं होतं. पण राज्यात मुसळधार पाऊस आणि भूस्खलन झाल्यामुळे रस्ते बंद होते. अशात विद्यार्थ्यांनी हेलिकॉप्टर भाड्याने घेतलं आणि वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचले.

काय म्हणाला विद्यार्थी?

परीक्षेसाठी ज्या विद्यार्थांनी परीक्षा केंद्र गाठलं त्यांचं नाव ओमाराम जाट, मंगाराम जाट, प्रकाश गोदारा जाट आणि नरपत कुमार आहे. यावर ओमाराम म्हणाला, ’31 ऑगस्ट रोजी आम्ही हल्द्वानी येथे पोहोचलो तेव्हा कळलं की मुनस्यारी जाणारे सर्व मार्ग भूस्खलनमुळे बंद करण्यात आले. आम्हाला असं वाटलं आम्ही आता परीक्षा देऊ शकत नाही..’

हेलिकॉप्टरच्या CEO सोबत साधला संपर्क…

ओमाराम म्हणाला, यानंतर त्यांना हल्द्वानी आणि मुनसियारी दरम्यान हेलिकॉप्टर सेवा पुरवणाऱ्या एका कंपनीबद्दल माहिती मिळाली. पण हवामान खराब होतं. त्यामुळे ही सेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती. पण आम्हा CEO यांनी विनंती केली. वेळेत पोहोचलो नाही तर, आम्ही परीक्षा देऊ शकणार नाही आणि आमचं एक वर्ष वाया जाईल.. अशी विनंती विद्यार्थ्यांनी केली.

यानंतर, कंपनीच्या सीईओंनी दोन वैमानिकांसह एक हेलिकॉप्टर पाठवलं. या हेलिकॉप्टरने विद्यार्थी मुनस्यारी येथील परीक्षा केंद्रावर पोहोचले आणि तेथून परीक्षा दिल्यानंतर ते जवळच्या हल्द्वानी येथे सुरक्षितपणे पोहोचले. हेलिकॉप्टरसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांला 5 हजार 200 रुपये मोजावे लागले… उत्तराखंड मुक्त विद्यापीठाचे बी.एड. परीक्षा प्रभारी सोमेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षा केंद्र उमेदवारांनी स्वतः निवडलं होतं.