AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“बंदे है हम उसके हमपे किसका जोर”, रस्त्यावर अभ्यास करताना इतकी एकाग्रता, तुम्ही म्हणाल “यशस्वी भव!”

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये इन्स्टाग्राम युझरने लिहिले की, 'आजचा बेस्ट व्हिडिओ'.

बंदे है हम उसके हमपे किसका जोर, रस्त्यावर अभ्यास करताना इतकी एकाग्रता, तुम्ही म्हणाल यशस्वी भव!
Studying under the street lightsImage Credit source: Social Media
| Updated on: Oct 28, 2022 | 2:01 PM
Share

चांगल्या शिक्षणानेच माणूस या जगात यश मिळवू शकतो. पण दुर्दैवाने प्रत्येकजण इतका भाग्यवान नाही ज्याला चांगल्या दर्जाचे शिक्षण घेण्याचा किंवा प्रसिद्ध शाळांमध्ये प्रवेश मिळविण्याचा अधिकार मिळेल. बरेच लोक यापासून वंचित असतात. त्यांच्यात इतकी क्षमता नसते. मात्र, चिकाटीने अभ्यास करणारे काही जण आपल्या मेहनतीच्या जोरावर वाट्टेल ते मिळवू शकतात अगदी शिक्षण सुद्धा! दारिद्र्यात जगणारे लोक शाळेत जाणं थांबवू शकत नाही. शिक्षणाचं खरं महत्त्व याच लोकांना माहित असतं.

असे लोक आहेत जे सर्व आव्हानांवर मात करण्यासाठी आणि साक्षर होण्यासाठी कठोर परिश्रम करण्यास तयार आहेत.

असाच एक प्रेरणादायी व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात एक मुलगी फुटपाथवर स्ट्रीट लाइटखाली वाचताना दिसत आहे.

इंटरनेटवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ stutes_zone_987  नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडीओमध्ये एक शाळकरी मुलगी आपल्या शाळेच्या ड्रेसमध्ये स्ट्रीट लाईटखाली आपल्या वहीत काहीतरी लिहिताना दिसत आहे.

रस्त्याच्या कडेला फुटपाथवर बसलेली ही मुलगी कुठेही इकडे तिकडे लक्ष न देता अभ्यास करण्यात मग्न दिसते. समोरून कुणीतरी तिचा व्हिडिओ कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला हे सुद्धा तिला माहीत होत नाही.

तिचं इतकं मन लावून अभ्यास करणं इंटरनेटवर बऱ्याच लोकांना भावलंय. अनेक लोकांना यातून प्रेरणा मिळालीये. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये इन्स्टाग्राम युझरने लिहिले की, ‘आजचा बेस्ट व्हिडिओ’.

दोन दिवसांपूर्वी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला जवळपास 7000 लोकांनी लाईक केलं आहे, तर अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होतोय.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.