रक्षाबंधनानिमित्त भाऊरायाला कुर्ता गिफ्ट करायचाय, येथे मिळतोय स्टायलिश कुर्ता

सध्या पुरुषांमध्ये शॉर्ट कुर्त्यांची फॅशन आहे. शॉर्ट कुर्त्यांमध्ये सुती कापडाचे फ्लोरल प्रिंट्स आणि पेस्टल रंग खूप लोकप्रिय आहेत. तुम्हाला जर आकर्षक कुर्ते शोधत असाल तर तुम्ही या मार्केटमधून स्वस्तात मस्त शॉर्ट कुर्ते खरेदी करू शकता

रक्षाबंधनानिमित्त भाऊरायाला कुर्ता गिफ्ट करायचाय, येथे मिळतोय स्टायलिश कुर्ता
| Updated on: Aug 17, 2024 | 9:28 PM

आजकल तरुण मुलांमध्ये कुर्ता परिधान करण्याची फॅशन आहे. शॉर्ट कुर्ता तुम्ही कॅज्युअल आणि सणासुदीला देखील परिधान करु शकता. आता रक्षाबंधनाच्या दिवशी जर आपल्या लाडक्या बंधूराजाला शॉर्ट कुर्ता गिफ्ट करायचा असेरतर मुंबईतील अंधेरी उपनगरातील मार्केटमध्ये तुम्हाला वाजवी किंमतीत सुंदर शॉर्ट कुर्ते मिळतात. या कुर्त्यांची किंमत खूपच कमी असून अवघ्या 500 रुपयात देखील येथे चांगल्या दर्जाचा कुर्ता मिळतो.

स्टायलीश शॉर्ट कुर्ता

पुरुषांना जर शॉर्ट कुर्ता परिधान करायचा असेल तर फ्लोरल प्रिंट आणि पेस्टल रंग खूपच लोकप्रिय आहे.जर तुम्हाला कमी खर्चात चांगल्या पद्धतीचा कुर्ता हवा असेल त अंधेरी मार्केटमध्ये तुम्हाचा शोध संपेल, या ठिकाणी कुर्त्याचे कलेक्शन एकदम भारी आहे. येथील प्रत्येक कुर्त्याती विशिष्ट खासियत आहे.

कॉटनचे स्टायलीश कुर्ते

सुती कापडाची आवड असणाऱ्यासाठी येथे स्टाईल आणि मिनिमलिज्म याचे मिश्रण पाहायला मिळते. हा एक ट्रेंडसेंटिग शॉर्ट कुर्ता आहे.यातील रंग डार्क आणि फिके देखील आहेत. याची किंमत पाचशे रुपये आहेत. याशिवाय येथे फॅन्सी पेस्टल गुलाबी रंगाचे हाताने विणकाम केलेले कॉटनचे कुर्ते देखील आहेत.पारंपारिक कुर्त्याचे हे आधुनिक रुप आहे.वेग-वेगळ्या डिजिटल प्रिटींगनूसार या कुर्त्यांना वेगवेगळा लूक दिलेला आहे. त्यामुळे या कुर्त्यांना तुम्ही सणासुदीत देखील परिधान करु शकतात. या कुर्त्याने तुमचे व्यक्तिमत्व उठून दिसते. याची किंमत सहा रुपये आहे.

चिकनकारी शॉर्ट कुर्ता

शुद्ध चिकनकारी सूती शॉर्ट कुर्त्यात फिकट रंगाचे कुर्ते अधिक आहेत. यात कामावर जाताना परिधान करता येईल असे कुर्ते देखील आहेत.हा कुर्ता ऑल टाईम फेव्हरेट होऊ शकतो. कारण, जीन्स पॅण्टसह हा कुर्ता खूपच स्टायलिश वाटतो. या कुर्त्याचा प्रत्येक लुक वेगळा दिसतो. याची किंमत देखील 500 रुपयांपासून सुरु होते.