Super-Earth Ross 508b:पृथ्वी पेक्षा चार पट मोठा ग्रह! इथे आहे 11 दिवसांचे एक वर्ष; या सुपर ग्रहावर जीवन देखील असू शकते

सूर्यमालेच्या बाहेरील ग्रहांना एक्सोप्लॅनेट असेही म्हणतात. म्हणून रॉस 508 बी देखील एक एक्सोप्लॅनेट आहे. हा ग्रह पृथ्वीपासून 37 प्रकाशवर्षे दूर आहे. नासाच्या मते हा ग्रह एका ताऱ्याभोवती फिरतोय ज्याचे वस्तुमान सूर्याच्या एक पंचमांश आहे.

Super-Earth Ross 508b:पृथ्वी पेक्षा चार पट मोठा ग्रह! इथे आहे 11 दिवसांचे एक वर्ष; या सुपर ग्रहावर जीवन देखील असू शकते
वनिता कांबळे

|

Aug 14, 2022 | 10:06 PM

नवी दिल्ली : शास्त्रज्ञांना अवकाशात पृथ्वीसारखे ग्रह सापडला आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था(Ross 508b )नासाने या ग्रहाचा शोध लावला आहे. हा ग्रह पृथ्वीच्या 4 पट मोठा आहे. हा ग्रह आपल्या आकाशगंगेच्या बाहेरील भागात आहे. शास्त्रज्ञांनी त्याला ‘रॉस 508 बी’ ()असे नाव दिले आहे. हा ग्रह आकारमानाने मोठा असल्याने याला ‘सुपर अर्थ’ (Super-Earth)असेही म्हटले जात आहे.

पृथ्वीपासून 37 प्रकाशवर्षे दूर

सूर्यमालेच्या बाहेरील ग्रहांना एक्सोप्लॅनेट असेही म्हणतात. म्हणून रॉस 508 बी देखील एक एक्सोप्लॅनेट आहे. हा ग्रह पृथ्वीपासून 37 प्रकाशवर्षे दूर आहे. नासाच्या मते हा ग्रह एका ताऱ्याभोवती फिरतोय ज्याचे वस्तुमान सूर्याच्या एक पंचमांश आहे. या ताऱ्याचे नाव रेड ड्वार्फ आहे. हा आपल्या सूर्यापेक्षा खूपच उजळ लाल रंगाचा आहे. थंड आणि मंद प्रकाश आहे. सुपर अर्थ 50 लाख किलोमीटर अंतरावरून प्रदक्षिणा घालते. आपल्या सूर्यमालेसह तुलना केल्यास पहिला ग्रह बुध देखील सूर्यापासून 60 दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे. अशा परिस्थितीत या एक्सोप्लॅनेटवर जीवसृष्टी शक्य आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एक्सोप्लॅनेटवर एक वर्ष 11 दिवस

रॉस ५०८ बी आणि रेड ड्वार्फमधील अंतर खूपच कमी असल्याने, एका एक्सोप्लॅनेटला तार्‍याभोवती फिरण्यासाठी फक्त 10.8 दिवस लागतात. म्हणजेच येथे एक वर्ष 11 दिवसांच्या बरोबरीचे आहे. पृथ्वीवरील एक वर्ष 365 दिवसांचे आहे. रॉस 508b हा जपानच्या सुबारू स्ट्रॅटेजिक प्रोग्रामने शोधलेला पहिला एक्सोप्लॅनेट आहे. सुबारू दुर्बिणीच्या मदतीने हे पाहिले गेले आहे. त्याचे तंत्रज्ञान जपानच्या अॅस्ट्रोबायोलॉजी सेंटरने विकसित केले आहे.

एक्सोप्लॅनेटवर जीवन शक्य आहे का?

नासाच्या म्हणण्यानुसार रॉस 508 बी चा पृष्ठभाग पृथ्वीपेक्षा जास्त खडकाळ असू शकतो. त्याची कक्षा लंबवर्तुळाकार आहे, म्हणजे ती नेहमी ताऱ्यापासून समान अंतरावर नसते. शास्त्रज्ञांच्या मते, असा ग्रह त्याच्या पृष्ठभागावर पाणी टिकवून ठेवण्यास सक्षम असू शकतो. तथापि, येथे प्रत्यक्षात पाणी किंवा जीवनाची भरभराट होते का यावर अधिक संशोधन सुरु आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें