AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना भारतात, ना परदेशात, बापाकडून बाळासाठी चक्क चंद्रावर जमिनीची खरेदी

विशेष म्हणजे यामुळे चंद्रावर जमीन खरेदी करणारे ते पहिले व्यावसायिक ठरले आहेत. (businessman buy land on the moon)

ना भारतात, ना परदेशात, बापाकडून बाळासाठी चक्क चंद्रावर जमिनीची खरेदी
चंद्र
| Updated on: Mar 26, 2021 | 3:19 PM
Share

अहमदाबाद : एखाद्या जवळच्या किंवा आवडत्या व्यक्तीला भेट म्हणून कोण काय देईल याचा काहीही नेम नाही. सूरतमध्ये राहणाऱ्या एका व्यावसायिक त्याच्या दोन महिन्याच्या बाळाला भेट म्हणून चक्क चंद्रावर जमीन विकत घेऊन दिली आहे. विजय कथेरिया असे त्या व्यावसायिक नाव आहे. विशेष म्हणजे यामुळे चंद्रावर जमीन खरेदी करणारे ते पहिले व्यावसायिक ठरले आहेत. (Surat businessman buy land on the moon for his two-month-old son)

चंद्रावर जमीन घेऊन देण्याचा निर्णय

विजय कथेरिया हे सूरतमधील व्यावसायिक आहेत. विजय हे काच खरेदी-विक्री करणारे व्यावसायिक आहे. ते मूळचे सौराष्ट्रमधील असून ते सध्या सूरतच्या सरथाणा या ठिकाणी राहतात. त्यांना दोन महिन्यापूर्वी त्यांच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. नित्या कथेरिया असे त्या बाळाचे नाव ठेवण्यात आले. बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याला काय तरी विशेष भेट द्यावी,  असा विचार विजय कथेरिया यांच्या मनात आला. पण त्यांना ठराविक गिफ्ट न देता काहीतरी खास आणि वेगळं गिफ्ट त्या बाळाला द्यायचं होतं. त्यामुळे त्यांनी बाळाच्या नावे चंद्रावर जमीन घेऊन देण्याचा विचार केला.

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत मान्यता

या निर्णयानुसार विजय यांनी यातील सर्व कायदेशीर गोष्टींची माहिती काढली. त्यानंतर त्यांनी  न्यूयॉर्क इंटरनॅशनल लूनार लँड रजिस्ट्री कंपनीला 13 मार्चला ईमेल पाठवत अर्ज केला. त्यात त्यांनी चंद्रावर जमीन खरेदी करायची असल्याचे सांगितले. यानंतर कंपनीने त्यांच्या अर्जावर सकारात्मक प्रतिसाद दिला. कंपनीने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत जमीन खरेदी करण्यास मान्यता दिली. तसेच त्यासंबंधित सर्व कागदपत्रं त्यांना पाठविली.

चंद्रावर जमीन खरेदी करणारे पहिले व्यावसायिक

विजय कथेरिया हे चंद्रावर जमीन खरेदी करणारे पहिले व्यावसायिक ठरले आहेत. तर त्यांचे हे बाळ कदाचित चंद्रावर जमीन असणारं सर्वाधिक लहान वयाची व्यक्ती ठरण्याची शक्यता असल्याचा दावा कंपनीकडून केला जात आहे. येत्या काही दिवसात कंपनीकडून अधिकृतपणे याबाबतची माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. (Surat businessman buy land on the moon for his two-month-old son)

संबंधित बातम्या : 

VIDEO | पोलिसाने सुनसान रस्त्यावर थांबवलं, त्यानंतर जे घडलं त्यावर विश्वास बसणार नाही

ideo | सोन्याची ‘अशी’ तस्करी कधी पाहिलीये का?, सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया

मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.