
पाऊस पडल्यामुळे सतत साप चावण्याच्या घटना सतत समोर येत आहेत. साप चावल्यानंतर लोक घाबरुन अनेकदा असे चुकीचे पाऊल उचलतात, जे जीवघेणे ठरताते. काही वेळा हा निष्काळजीपणा आजूबाजूच्या लोकांनाही महागात पडते. साप चावल्यानंतर अनेकलोक घाबरतात, त्यामुळे त्यांच्या हृदयाचे ठोके वाढतात. त्यामुळे सापाचे विष शरीरात झपाट्याने पसरते. अशा परिस्थितीमध्ये साप चावलेल्या व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो. त्यामुळे साप चावल्यावर कोणत्या गोष्टी करायला हव्यात एका जाणून घ्या…
घाबरल्यामुळे चुकीचे पाऊल
एका सर्पमित्राने सांगितले की, साप चावल्यानंतर अनेकदा लोक अज्ञानामु ळे किंवा घाबरल्यामुळे अशा चुका करतात. त्यामुळे पीडिताचा जीव धोक्यात येतो. त्यांचा अनुभव सांगतो की योग्य माहिती आणि त्वरित उपचार हाच हा उपाय जीव वाचवू शकतो.
वाचा: लघवीला वास येतोय? फक्त आहार नाही, तर गंभीर आजारांचा संकेत; जाणून घ्या 5 कारणे
साप चावताच सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे पीडिताला एक क्षणही न दवडता जवळच्या रुग्णालयात पोहोचवणे. ‘गोल्डन पीरियड’ म्हणजे साप चावल्यानंतरच्या सुरुवातीच्या काही तासांत जर रुग्णाला अँटी-व्हेनमचा डोस मिळाला, तर त्याचा जीव वाचू शकतो. त्यामुळे वेळेत रुग्णालयात पोहोचणे हीच पहिली प्राथमिकता असावी. साप चावल्यानंतर त्या सापाला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न अजिबात करू नये. त्या वेळी साप अत्यंत आक्रमक आणि संतापलेला असू शकतो, ज्यामुळे तो दुसऱ्या कोणाला चावू शकतो आणि परिस्थिती आणखी गंभीर बनू शकते.
सापाचे स्पष्ट छायाचित्र घ्या
शक्य असल्यास, सापाचे स्पष्ट छायाचित्र घ्या, पण असे करताना पूर्ण खबरदारी घ्या. छायाचित्र पाहून डॉक्टरांना साप हिमोटॉक्सिन (रक्तावर परिणाम करणारा) आहे की न्यूरोटॉक्सिन (मज्जासंस्थेवर परिणाम करणारा) याचा प्रकार ओळखता येईल, ज्यामुळे योग्य अँटी-व्हेनम निवडणे सोपे होईल आणि उपचार प्रभावी ठरतील.
चित्रपटांमध्ये दाखवले जाणारे सापाचे विष शोषून घेणे किंवा जखमेला घट्ट बँडेज बांधणे यासारख्या पद्धतींपासून पूर्णपणे टाळावे. विष शोषल्याने शोषणाऱ्या व्यक्तीचा जीवही धोक्यात येऊ शकतो आणि जखमेला घट्ट बांधल्याने रक्ताभिसरण थांबू शकते, ज्यामुळे प्रभावित अवयवाला मोठे नुकसान होऊ शकते.
तांत्रिक क्रिया किंवा औषधी वनस्पतींच्या वापर पूर्णपणे टाळावा. अशा अवैज्ञानिक पद्धती केवळ वेळेची नासाडी करतात आणि पीडिताला रुग्णालयात पोहोचण्यास अनावश्यक विलंब होतो. साप चावण्याचा एकमेव प्रमाणित उपचार म्हणजे अँटी-व्हेनम, जो फक्त सरकारी आणि काही खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे अंधश्रद्धेत न पडता तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.
(डिस्क्लेमर : बातमीत दिलेल्या माहितीला आम्ही दुजोरा देत नाही. कोणताही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला घेऊनच उपचार करावेत.)