
दक्षिण दिल्लीतील एका शैक्षणिक संस्थेशी संबंधित स्वामी चैतन्यानंद सरस्वतीवर लैंगिक शोषण आणि विद्यार्थिनींच्या करिअरचे उद्धवस्त करण्यासारखे गंभीर आरोप आहेत. स्वत:ला आध्यात्मिक गुरु म्हणवणारा हा बाबा एक मोठा गुन्हेगार असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी कारवाई करत त्याला आग्रा येथून अटक केली. चैतन्यानंदवर एक-दोन नव्हे, तर डझनभराहून अधिक विद्यार्थिनींनी गंभीर आरोप केले आहेत. हा आरोपी बाबा बराच काळ विद्यार्थिनींना चांगल्या प्लेसमेंटचे आमिष दाखवून त्यांच्याशी गैरकृत्य करत होता. पण म्हणतात ना, प्रत्येक पापीचा पापाचा घडा एक दिवस फुटतोच. चिन्मयानंदच्या बाबतीतही असेच काहीसे घडले. स्वत:ला आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व म्हणवणारा हा बाबा अखेर पोलिसांच्या हाती लागलाच. चला, स्वामी चैतन्यानंदच्या अटकेची कहाणी जाणून घेऊया.
हॉटेल फर्स्ट बनले ठिकाण
पोलिस तपासात समोर आले की, फरार असलेला चैतन्यानंद आग्रा येथील ताजगंज परिसरातील हॉटेल होम फर्स्टमध्ये लपला होता. हॉटेलच्या खोली क्रमांक 101 मध्ये त्याने आपला अड्डा बनवला होता. येथूनच तो रात्री विद्यार्थिनींना बोलावत असे आणि त्यांना आमिष दाखवून फसवण्याचा प्रयत्न करत असे. त्याच्याविरुद्ध 4 ऑगस्टला दिल्लीच्या वसंतकुंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता आणि तेव्हापासून पोलिस त्याचा शोध घेत होते.
वाचा: 19-20 वर्षाच्या मुलींना माझा व्हिडीओ… प्राजक्ता माळीने सांगितला धक्कादायक अनुभव
रात्री उशिरा बाबावर कडक कारवाई
शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री, पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक हॉटेलबाहेर पोलिसांची हालचाल वाढली. पोलिसांनी हॉटेलला घेरले आणि थेट खोली क्रमांक 101 मध्ये पोहोचले. बाबाने फारसा विरोध न करता पोलिसांना शरण जाणे पत्कारले. अटक केल्यानंतर त्याला थेट दिल्लीला नेण्यात आले.
हॉटेल कर्मचाऱ्यांचा खुलासा
हॉटेल कर्मचाऱ्यांनी सांगितले की, बाबा कोणासोबत तरी आमच्या हॉटेलमध्ये आला होता. त्याने ओळखपत्र जमा केले होते. रात्री साधारण 3 वाजता पोलिस आले आणि आमच्याकडून कोणतीही माहिती न घेता थेट खोलीत जाऊन बाबाला पकडले. तो आमच्या शेजारी राहणाऱ्या कौशल भाई यांच्यासोबत आला होता.
काळ्या कृत्यांचा पर्दाफाश
स्वामी चैतन्यानंदच्या अटकेसह त्याच्या काळ्या विश्वाचा खरा चेहरा समोर आला आहे. पीडित मुलींच्या तक्रारी आणि पोलिसांच्या कठोर कारवाईने हे दाखवून दिले की, कोणी कितीही मोठा गुरु बनला तरी पापाचा घडा एक दिवस फुटतोच. आता दिल्ली पोलिस त्याची सतत चौकशी करत आहेत आणि या प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.