Viral : स्विमिंग पूलमधून प्लॅस्टिक काढताना दिसला हंस; Video पाहून यूझर्स म्हणाले, माणसापेक्षा जास्त हुशार!

आज प्लास्टिकचा वापर योग्य की अयोग्य या संभ्रमात मानव असला तरी प्राणी-पक्ष्यांनी मात्र निसर्गासाठी त्यांना खलनायक ठरवले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Viral : स्विमिंग पूलमधून प्लॅस्टिक काढताना दिसला हंस; Video पाहून यूझर्स म्हणाले, माणसापेक्षा जास्त हुशार!
हंस
| Updated on: Jan 19, 2022 | 7:24 AM

चित्रपटाच्या नायकाप्रमाणे आपल्या आयुष्यात प्लास्टिक (Plastic) येते. म्हणजेच अनेक गरजांसाठी योग्य, कमी खर्चात तयार स्वस्त उपाय. उद्योगांनाही हे समजते आणि त्याचा ते पुरेपूर फायदा घेतात. इतकं सगळं असूनही त्याचा शेवट एखाद्या चित्रपटातील खलनायकासारखा होतो. प्लास्टिकपासून बनवलेल्या बहुतांश वस्तू उघड्यावर जाळल्या जातात किंवा गाडल्या जातात. किंवा ते इकडे तिकडे टाकले जाते, जिथून ते जमिनीत शिरते आणि आपल्या भूजल साठ्यात मिसळते. नद्यां(Rivers)मधून वाहत जाऊन समुद्रा(Sea)त मिळते. पण तो आपला हिरो आहे की खलनायक, हे आजपर्यंत आपण ठरवू शकलो नाही..!

प्लास्टिक अनावश्यकच

आज प्लास्टिकचा वापर योग्य की अयोग्य या संभ्रमात मानव असला तरी प्राणी-पक्ष्यांनी मात्र निसर्गासाठी त्यांना खलनायक ठरवले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो पाहिल्यानंतर कदाचित आपले डोळे उघडतील.

पक्ष्याने दिला संदेश

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक काळा हंस पाण्यापासून वेगळे करून प्लास्टिक साफ करण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडिओ पाहून कदाचित तुम्हालाही पक्ष्याने दिलेला संदेश समजेल आणि तुमच्या आयुष्यात प्लास्टिकचा वापर कमी होईल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूझर्सनीही आपलं मत मांडायला सुरुवात केली.

ट्विटर अकाउंटवरून शेअर

हा धक्कादायक व्हिडिओ भारतीय वन सेवेचे अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या सोशल मीडिया ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. ज्यासोबत त्यांनी कॅप्शन लिहिले, की ‘प्लास्टिक डिस्पोजेबल आहे, पण आपली पृथ्वी नाही… हंसालाही ही गोष्ट माणसांपेक्षा चांगली समजते. या व्हिडिओला 67 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर 1300हून अधिक रिट्विट्स आणि 6000हून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

Viral : क्वचितच पाहिला असेल असा आळशी कुत्रा! 30 लाखांहून अधिक व्ह्यूजचा ‘हा’ Video पाहा

Video | मसाला डोसा आईस्क्रिम रोल! ऐकायला इतकं विचित्र आहे, चवीला कसं असेल?

Video | भूकंप आला तर जीव वाचवाल की दारुच्या बाटल्या? हा दादुस दारुसाठी जीवही द्यायला तयार!