AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral : क्वचितच पाहिला असेल असा आळशी कुत्रा! 30 लाखांहून अधिक व्ह्यूजचा ‘हा’ Video पाहा

सोशल मीडिया(Social Media)वर कुत्र्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होतात, ज्यात काही हसवतात तर काही आश्चर्यचकित करतात. असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कुत्र्याचा आळस पाहून तुम्हाला कमाल वाटेल.

Viral : क्वचितच पाहिला असेल असा आळशी कुत्रा! 30 लाखांहून अधिक व्ह्यूजचा 'हा' Video पाहा
आळशी कुत्रा
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Jan 19, 2022 | 6:54 AM
Share

जसे माणसांमध्ये असे घडते की काही लोक खूप सक्रिय असतात, तर काही लोक खूप आळशी असतात, त्याच प्रकारे हे प्राण्यांमध्ये देखील घडते. यामध्ये देखील सक्रिय आणि आळशी प्राणी आहेत. सामान्यतः कुत्रे (Dogs) आणि मांजरी (Cats) हे सक्रिय प्राणी मानले जातात, कारण ते दिवसभर खेळतात आणि फिरतात, परंतु काही आळशी देखील असतात, ज्यांचा आळशीपणा त्यांना उठू देत नाही. त्यांना फक्त एकाच ठिकाणी राहायला आवडते. सोशल मीडिया(Social Media)वर कुत्र्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होतात, ज्यात काही हसवतात तर काही आश्चर्यचकित करतात. असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कुत्र्याचा आळस पाहून तुम्हाला कमाल वाटेल.

शॉपिंग मॉलमधील व्हिडिओ

तुम्ही पाहू शकता, की एक व्यक्ती शॉपिंग मॉलमध्ये जात. त्याच्याबरोबर कुत्रा आहे. तो कुत्र्याला ओढत पुढे नेत आहे. ती व्यक्ती त्याला ओढत आहे, पण तो उठण्याचे नावही घेत नाही. असा आळशी कुत्रा तुम्ही तुमच्या आयुष्यात क्वचितच पाहिला असेल, ज्याला ओढत नेले जात असेल. तुम्ही ऐकलेच असेल, की आळस हा एका आजारासारखा असतो, जो माणसाचे शरीर, मन आणि संपत्ती नष्ट करतो. आळसाने ग्रासलेली व्यक्ती कठोर परिश्रम करण्यास कचरते आणि आता प्राण्यांमध्येही हे दिसून येत आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर nemo_ogolden नावाने शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 36 दशलक्ष म्हणजेच 36 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 1.6 दशलक्ष म्हणजेच 16 लाख लोकांनी व्हिडिओला लाइकदेखील केले आहे. त्याचबरोबर व्हिडिओ पाहून अनेकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Nemo (@nemo_ogolden)

कुत्रा झाला आळशी

अनेकदा तुम्ही कुत्र्यांना खेळताना आणि धावताना पाहिले. त्यामुळेच मोठ्या संख्येने लोकांना कुत्रे पाळणेदेखील आवडते, कारण यामुळे लोकांना त्यांच्याबरोबर सक्रिय राहण्यास मदत होते. पण तोच जर आळशीपणाचा बळी पडला तर काय करायचे?

Video | भूकंप आला तर जीव वाचवाल की दारुच्या बाटल्या? हा दादुस दारुसाठी जीवही द्यायला तयार!

Video | मसाला डोसा आईस्क्रिम रोल! ऐकायला इतकं विचित्र आहे, चवीला कसं असेल?

पैसे सुट्टे करण्यासाठी लॉटरीचं तिकीट काढलं, 68 वर्षीय पेंटरला थेट 12 कोटींचा जॅकपॉट

Follow Us
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...