Video | मसाला डोसा आईस्क्रिम रोल! ऐकायला इतकं विचित्र आहे, चवीला कसं असेल?

Video | मसाला डोसा आईस्क्रिम रोल! ऐकायला इतकं विचित्र आहे, चवीला कसं असेल?
Source - Instagram

हल्ली सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि या व्हिडिओमध्ये मसाला डोसा आइस्क्रीम रोल बनवलेली डिश ही प्रत्येकाच्या चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडिओवर अनेक नेटिजन कमेंट करत आहेत काही जणांनी तर या नवीन फ्यूजन फूड डिश वर संताप देखील व्यक्त केला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Jan 18, 2022 | 8:41 PM

आपल्यापैकी प्रत्येकाला आईस्क्रीम खाणे आवडत असते. असा एखादा व्यक्ती असेल की जो आईस्क्रीम ला नाही म्हणत.आईस्क्रीम उन्हाळा, हिवाळा असू दे किंवा पावसाळा असुद्या प्रत्येक ऋतूमध्ये आईस्क्रीमला (Ice-Cream) भरपूर मोठ्या प्रमाणावर मागणी असते. आईस्क्रीम ही वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आपण खात असतो. जेव्हा एखादी आईस्क्रीम बनते तेव्हा ती बनवतानाची प्रक्रिया पाहून आपल्या तोंडाला पाणी सुटत असते आणि ही प्रक्रिया अतिशय मजेशीर असते आणि म्हणून अनेक जण जेव्हा आईस्क्रीमवाला आईस्क्रीम बनवतो तेव्हा कौतुकाने त्यांच्याकडे आपण पाहत असतो. इंटरनेट (Internet) हे असे माध्यम आहे की या माध्यमावर प्रत्येक गोष्ट प्रचंड वेगाने पसरत जाते मग ती एखादी बातमी असो किंवा एखादा व्हिडिओ सोशल मीडियावर क्षणातच लाखो करोडो लोक एखादी गोष्ट पाहून जातात. अशीच परिस्थिती सध्या सोशल मीडिया वर चर्चेचा विषय ठरलेला आहे परंतु हा व्हिडिओ एका स्पेशल डिशचा आहे, तो म्हणजे मसाला डोसा आइस्क्रीम रोल. नाव काहीतरी विचित्र आहे ना हो अशाच काही तरी आगळ्यावेगळ्या कमेंट या व्हिडिओला मिळत आहेत. परंतु हा व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग आहे आणि म्हणूनच या व्हिडिओला लाईक सुद्धा खूप मिळालेले आहे आजच्या लेखामध्ये आपण अशा या आगळ्यावेगळ्या बद्दल महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

इंटरनेटवर जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो व्हिडिओ दिल्लीमधील एका दुकानात बनवलेला आहे आणि या दुकानांमध्ये मसाला डोसा आइस्क्रीम रोल तयार केला जात आहे. या बनवलेला व्हिडिओ वर लोकांनी खूप सारे कमेंट सुद्धा दिलेले आहेत आणि लोक कल्पना सुद्धा करवत नाही की या डीशची नेमकी चव कशी असेल डोसा सारखी तिखट असेल की आईस्क्रीम सारखी गोड असेल? या व्हिडिओवर अनेकांनी संतप्त प्रक्रिया सुद्धा दिलेल्या आहेत. हा व्हिडिओ @thegreatindianfoodie या युझर द्वारे अपलोड केला गेला आहे आणि त्याला 1.4 मिलियन विव्ह, 16.2k लाईक्स, 2720 कमेंट्स लोकांनी केल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टींमध्ये सेकंद सेकंद मध्ये वाढ होत आहे.

अशी बनवली जात आहे ही डिश

ही दिशा नेमकी कशी आहे याबद्दल अनेकांच्या मनामध्ये पुस्तक सुद्धा आहे आणि प्रत्येक जण सोशल मीडियावर या दिशेला पाहून सुद्धा होता हे खरे तर या व्हिडिओमध्ये, जर नीट पाहिले तर सुरुवातीला मसाला डोसा चे तुकडे केले गेले आहेत आणि नंतर हे तुकडे एका क्रिममध्ये मिसळले आहेत. आता सगळे मिश्रण एकजीव केल्यानंतर आइस्क्रीम रोजच्या प्लेटमध्ये आलू मसाला टाकला जातो त्यानंतर डोसा प्रमाणे याचे रोल बनवले गेले आणि त्यानंतर नारळाची चटणी सोबत लोकांना खायला दिला जात आहे.

या बनवलेला आगळ्यावेगळ्या डिश मुळे प्रत्येक जण व्यक्त होत आहेत आणि अनेक जण कौतुक करत आहेत आणि अनेक जण या विचित्र डिश व्हिडिओ पाहून संताप देखील व्यक्त करत आहेत.

पाहा व्हिडीओ –

इतर बातम्या :

Video | भूकंप आला तर जीव वाचवाल की दारुच्या बाटल्या? हा दादुस दारुसाठी जीवही द्यायला तयार!

Video : हाय हिल्स घालूनही मुलीनं केला अप्रतिम बॅक फ्लिप! यूझर्स म्हणतायत, आम्ही स्निकर्स घालूनही नाही करू शकत

पैसे सुट्टे करण्यासाठी लॉटरीचं तिकीट काढलं, 68 वर्षीय पेंटरला थेट 12 कोटींचा जॅकपॉट


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें