VIDEO | इतका भयानक पाऊस की, स्पीडमध्ये आलेल्या पाण्याने पार्किंगमधील गाड्या कचऱ्यासारख्या वाहून गेल्या

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये पावसाच्या पाण्यातून गाड्या वाहून गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गाड्या आगपेटीसारख्या वाहून गेल्यामुळे पाहणाऱ्या लोकांना आच्छर्य वाटलं आहे.

VIDEO | इतका भयानक पाऊस की, स्पीडमध्ये आलेल्या पाण्याने पार्किंगमधील गाड्या कचऱ्यासारख्या वाहून गेल्या
trending news
Image Credit source: tv9marathi
| Updated on: May 29, 2023 | 1:15 PM

नवी दिल्ली : पाऊस पडल्यानंतर (Heavy Rain) अनेकांना पाणी पाहायला आवडतं. परंतु त्या पाण्याचा वेग इतका असतो की, त्याचा कुणाला अंदाज लागत नाही. पाण्याच्या ताकदीने काय-काय वाहून गेलंय हे आपण अनेकदा व्हिडीओच्या (viral video on social media) माध्यमातून पाहिलं आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (trendin video) झाला आहे. तो व्हिडीओ स्पेन देशातील असल्याचं समजतं. पाण्याच्या वेगाने तिथल्या कार आगपेटीसारख्या वाहून गेल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. त्या रस्त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी जात होतं, त्यावेळी एक कारचालक तिथून निघाला आहे. पाण्याचा वेग इतका आहे की, कार त्या पाण्यातून वाहून जाते. या व्हिडीओला चार लाख लोकांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर एका वेबसाईटनं असं सुध्दा म्हटलं आहे की, पार्किंग केलेल्या कार सुध्दा पाण्यातून वाहून गेल्या आहेत.

कार पाण्याातून वाहून गेल्या

या व्हिडीओला एमेस्टे नावाच्या व्यक्तीने ट्विटरवरती शेअर केले आहे. सांगितलं जात आहे की, हा व्हिडीओ स्पेन देशातील एका परिसरातील आहे. तिथं अतिवृष्टी झाल्यामुळे शहरात सगळीकडं पाणीचं पाणी आहे. त्यामध्ये एका व्यक्तीनं कार चालवण्याचं डेरिंग केलं. परंतु त्या व्यक्तीचा प्रयत्न फसला, त्यामुळे त्या व्यक्तीची कार पूराच्या पाण्यातून वाहून गेली. त्यावेळी इमारतीमधून एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद केला आहे. विशेष म्हणजे पाण्याचा वेग इतका होता की, गाडीच्या चालकाला त्यामध्ये गाडी चालवणं शक्य झालं नाही. हा व्हिडीओ कुठल्या भागातील आहे, याची अद्याप खात्री झालेली नाही. परंतु या व्हिडीओला अधिक लोकांनी पाहिलं आहे.

पाण्याचा वेग पाहून लोकांना घाम फुटला

मागच्या काही दिवसांपासून स्पेन या देशाची राजधानी मेड्रिडमध्ये अतिवृष्टी झाली होती, त्यावेळी सुध्दा सगळीकडं पाणीचं पाणी झालं होतं. सगळीकडं पूर आल्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं होतं. रस्त्यावर कंबरेपेक्षा अधिक पाणी असल्यामुळे लोकांची तारांबळ उडाली आहे. काही गाड्या जिथं पार्किंग केल्या होत्या, तिथं बुडाल्या. तर काही गाड्या आगपेटीसारख्या वाहून गेल्या.