AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Trending:एका माणसाची कुत्रा होण्याची गोष्ट, 11 लाख रुपये केले खर्च, जपानच्या विक्षिप्त माणसाचा भन्नाट किस्सा..

माणसापासून कुत्र्याचं रुप घेणाऱ्या टोकोने सोशल मीडियावर त्याचा एक फोटोही शेअर केला आहे. हा फोटो पाहून, हा माणूस आहे, यावर तुमचाही विश्वास बसणार नाही. सध्या या फोटोची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.

Trending:एका माणसाची कुत्रा होण्याची गोष्ट, 11 लाख रुपये केले खर्च, जपानच्या विक्षिप्त माणसाचा भन्नाट किस्सा..
man become dog 5Image Credit source: social media
| Edited By: Sandip Sakhare | Updated on: May 26, 2022 | 4:54 PM
Share

टोकियो– (Tokyo)जगात अशी अनेक माणसं असतात की ती त्यांच्या विक्षिप्तपणासाठीच प्रसिद्ध असतात, अनेकदा तर त्यांच्या या विक्षिप्तपणापायी ते काहीही करतात. आणि त्यांचा हा विक्षिप्तपणाच त्यांची ओळख निर्माण करतो. अशाच एका विक्षिप्तपणाचा किस्सा जपानमध्ये (JAPAN)घडला आहे. माणसाला बाई होण्याची इच्छ किंवा बाईला माणूस इच्छा होण्याची इच्छा आपण समजू शकू, पण जपानमध्ये एका माणसाला कुत्रा (man become dog)होण्याची हौस निर्माण झाली आणि त्याच्या या हौशेमुळे सगळेच जण बुचकळ्यात पडले. जपानमध्ये राहणाऱ्या या वल्लीचे नाव टोको असे आहे. आणि आता तो कुत्राही झाला आहे. माणसापासून कुत्र्याचं रुप घेणाऱ्या टोकोने सोशल मीडियावर त्याचा एक फोटोही शेअर केला आहे. हा फोटो पाहून, हा माणूस आहे, यावर तुमचाही विश्वास बसणार नाही. सध्या या फोटोची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.

लहानपणापासूनचे स्वप्न

टोकोचे लहानपमापासूनचे स्वप्न होते की त्याला कुत्र्यासारखे जगायचे होते. आता कुणाला काय वाटेल हे सांगता येणे कठीण आहे. यासाठी जपानची एक प्रोफेशनल एजन्सी जेपेट वर्कशॉप कंपनीने त्याला मदत केली. या कंपनीने टोकोला कुली नावाच्या एका कुत्र्याच्या जातीत रुपांतर करुन दाखवले.

माणसापासून कुत्रा होण्यासाठी 11 लाख रुपयांचा खर्च

या टोकोच्या मनाने कुत्रा होण्याचे एवढे घेतले की त्याने यासाठी 11 लाख रुपये ( सुमारे २ दशलक्ष जपानी येन) खर्च केले. इतक्या पैशांत त्याने असा एक कॉस्च्युम तयार केला की, तो कॉस्च्युम घातल्याने टोको एकदम कुत्र्यासारखा दिसू लागला. या पेहरावात त्याला ओळखणे अशक्यच आहे.

MAN BECOME DOG

MAN BECOME DOG

हुबेहुब कुत्रा दिसण्यासाठी मेहनत

हा कुत्र्याचा कॉस्च्युम तयार करण्यासाठी तब्बल 4० दिवस लागले. हा पेहराव तयार करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली असे हा पेहराव निर्मिती करणाऱ्या कंपनीने सांगितले आहे. माणूस आणि कुत्रा यांच्या दिसण्यात बरेच अंतर आहे, नाटकासाठी कुत्रा होणे वेगळे, पण टोकोला अगदी हुबेहुब कुत्रा दिसायचे होते. त्यासाठी मेहनतीने असा पेहराव तयार करण्यात आला.

कुली या जातीच्या कुत्र्याचीच का निवड

या टोकोला जेव्हा कुली या कुत्र्याच्या जातीचीच का निवड करण्यात आली असे विचारण्यात आले, तेव्हा त्याने सांगितले की, कुली हा त्याचा सर्वाधिक आवडता कुत्रा आहे आणि तो सगळ्यात क्यूटही आहे. तसेच विशेष म्हणजे या कुत्र्याला मोठे, लांब केस असतात. अशा स्थितीत मानवी शरिराला या पेहरावात लपवणे सहज शक्यही आहे. त्यामुळेच कुली जातीच्या कुत्र्याची निवड केल्याचे टोकोने सांगतिले आहे. त्याचे कॉस्च्युम घातलेले फोटो पाहिले तर हा माणूस आहे, यावर विश्वास ठेवणे अवघड आहे.

हालचालींच्या काही मर्यादा मात्र स्वप्नपूर्तीचा आनंद

हा पेहराव घातल्यावर हात–पाय हलवणे शक्य होते का, असा प्रश्न विचारल्यावर त्याने या पेहरावात काही अडचणी, मर्यादा येतात हे मान्य केले खरे, मात्र मानवाप्रमाणे हालचाल केली तर कुत्रा कसा वाटेल, असा प्रतिप्रश्नही त्याने केला.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!