AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : पाठवणीच्या वेळी नवरी सासरीच जाईना, मग घरच्यांनी जे केले ते पाहून हसू आवरणार नाही

वधूला लग्न मंडपातून चौघांनी उचलून घेत नवरोबाच्या गाडीमध्ये बसवले. तिने लग्न मंडपात रडून जोरदार कल्लोळ केला. त्यामुळे तिचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच गाजला आहे.

VIDEO : पाठवणीच्या वेळी नवरी सासरीच जाईना, मग घरच्यांनी जे केले ते पाहून हसू आवरणार नाही
पाठवणीच्या वेळी नवरीचा व्हिडिओ व्हायरलImage Credit source: social
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Nov 02, 2022 | 11:30 PM
Share

एक काळ असा होता, ज्यावेळी लग्नामध्ये माहेरचे घर सोडताना अंतकरण जड व्हायचे. वधू आपल्या आई-वडिलांना घट्ट मिठी मारत रडत असायची. माहेरच्या घरातून तिचे पाय निघेनासे व्हायचे. मात्र आता काळ बदलला आहे. कित्येक तरुणी तर आपल्या आई-वडिलांना विश्वासात न घेताच विवाहबंधनात अडकतात, कित्येक जणी स्वतःच्या मर्जीने आपल्या साथीदार निवडून धुमधडाक्यात लग्न करून सासरच्या घरी जातात. सध्याच्या डिजिटल जमान्यात हा बदल पाहायला मिळतो आहे. पण त्यातही काही तरुणी या बदलापासून दूर आहेत. सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून याचीच प्रचिती येत आहे.

वधूला लग्न मंडपातून चौघांनी उचलून घेत नवरोबाच्या गाडीमध्ये बसवले. तिने लग्न मंडपात रडून जोरदार कल्लोळ केला. त्यामुळे तिचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच गाजला आहे.

माहेरच्या लोकांचा निष्ठुरपणा

घरात लहानाची मोठी झालेली कन्या दुसऱ्या घरी पाठवताना आई वडील फार भावनिक होतात. किंबहुना संपूर्ण कुटुंबच जड अंतकरणाने लाडक्या मुलीला निरोप देत असतात. वायरल व्हिडिओमध्ये मात्र नेमके उलटे चित्र आहे.

माहेरचे लोक चक्क निष्ठूर बनले आहेत. त्यांनी वधू असलेल्या आपल्या कन्येला जबरदस्तीने उचलले आहे आणि नवरोबाच्या कारमध्ये नेऊन बसवले.

इतर लग्नांमध्ये दिसणारी लगीनघाई आणि व्हायरल व्हिडिओतील मंडपात दिसलेली धावपळ यामधला फरक सर्वांनाच पोट धरून हसायला लावत आहे.

व्हिडिओ पहा आणि तुम्हीही पोट धरून हसा!

माहेर सोडताना रडून हैराण झालेल्या वधूचा व्हिडिओ पाहताना सोशल मीडिया युजर्स मोठ्या प्रमाणावर आनंद घेत आहेत. युजर्स व्हिडिओवरती अनेक रंजक कमेंट्स नोंदवत आहेत. लाईक्सचा तर क्षणाक्षणाला पाऊस पडतो आहे.

लोक स्वतः हा व्हिडिओ पाहून आपल्या मित्र-मैत्रिणींनाही शेअर करत आहेत. त्यामुळे व्हिडिओच्या चाहत्यांचा आकडा वाढतोच आहे. तुम्हालाही हा व्हिडिओ पहायचा असेल तर पोट धरून हसण्याची तयारी ठेवा.

Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट