AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Trending News : पाच हजार वर्षांपूर्वीही लोक दणक्यात पार्टी करायचे , मौजमजा करायला बिअरही प्यायचे, पब – फ्रिज आणि ओव्हनचे मिळाले पुरावे…

इराकमध्ये झालेल्या खोदकामात सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीचे अवषेश सापडले आहेत. यात जुना पब आणि रेस्टारंटचे पुरावे सापडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Trending News :  पाच हजार वर्षांपूर्वीही लोक दणक्यात पार्टी करायचे , मौजमजा करायला बिअरही प्यायचे, पब - फ्रिज आणि ओव्हनचे मिळाले पुरावे...
IRAQ- 5000 YEAR OLD FRIDGEImage Credit source: socialmedia
| Updated on: Feb 17, 2023 | 9:29 AM
Share

नवी दिल्ली : आपण आता कोणतेही आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी मित्रांना पार्टी देत असतो. परंतू मनोरंजनाचे कोणतेही साधन नसताना पाच हजार वर्षांपूर्वीही लोक  पार्टी करायला पबमध्ये जायचे आणि बियर प्यायचे याचे पुरावे पुरातत्वतज्ज्ञांना सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आज आपल्याजवळ हवी ती मनोरंजनाची साधने आहेत, परंतू पाच हजार वर्षांपूर्वी लोकांचे जीवन कसे होते याचे पुरावे इराकमधील खोदकामात सापडले आहेत.

संशोधनात काय पुढे आले आहे …

रिपोर्ट नूसार दक्षिण इराक येथील खोदकामात पाच हजार वर्षांपूर्वी मानवी संस्कृतीचा उलगडा होणार आहे. इ.स. पूर्व 2700 मध्ये सर्वसामान्याचे जीवन कसे होते, याचा अंदाज हळूहळू खोदकामात मिळणाऱ्या वस्तूंमुळे संशोधकांना येत आहे. या खोदकामात मातीच्या चुली, एवढच काय मातीचा फ्रिज, रेस्टोरेंट आणि पब सापडला आहे, त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. यात काही कोनीकल शेपच्या काही वाट्या सापडल्या आहेत. या वाट्यांमध्ये मासे आणि काही प्राण्यांच्या मांसाचे हाडे सापडली आहेत.

पेन्सील्वेनिया युनिवर्सिटी आणि पिसा युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त पथकाने आदीम मनुष्यजातीचे अवशेष आणि एक मोठा ओव्हन, जेवणाऱ्यांसाठी मोठ्या आकारांचे बेंच आणि टेबल्स आणि सुमारे 150 सर्व्हीग बाऊल सापडली आहेत. अहवालानूसार येथे खोदकात बियरचे पुरावेही सापडले आहेत. संशोधकांनी असा दावा केला आहे की आपले पूर्वज बियर प्यायचे. प्रोजेक्ट डायरेक्टर होली पीटमॅन यांनी म्हटले आहे की त्यांना त्याकाळातील मातीचा फ्रीज ही सापडला आहे. शेकडो विविध आकारची भांडी, जेवणाचे टेबल आणि बेंच सापडले. येथे लोक विरूंगळ्यासाठी एकत्र जमून आराम करायचे असेही त्यांनी सांगितले.

हा एक इंडस्ट्रीय हबचा परिसर होता

लागाश नावाच्या एक हजार एकरवर पसरलेल्या या पुरातत्व जागेची पाहणी करण्यात आली आहे, येथे एक इंडस्ट्रीय हबचा परिसर होता. दक्षिण मेसोपोटामियाच्या सगळ्यात मोठ्या हा शहरांपैकी लागाश हा परिसर होता. हा प्रदेश आर्थिक, राजकीय आणि धार्मिक केंद्र देखील होता. येथील लोक दूध देणारी गुरे पाळायचे, मासे पकडायचे आणि शेती देखील करायचे. आमची टीम या लोकांच्या व्यवसायाबद्दल आणखी माहीती काढत आहेत. ई.स पूर्व 2700 मध्ये मधुशालाचा ( पब ) वापर करणारी ही मानवी संस्कृती आश्चर्यजनक असल्याचे पीटमन यांनी म्हटले आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.